जी-20 देशांकडून भारताची ‘ही’ विनंती मान्य

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

ब्यूनस आयर्स, अर्जेंटिना : 2022 च्या जी-20 देशांच्या संमेलनाच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. जी-20 हा जगातिल प्रमुख 20 अर्थव्यवस्थांचा समूह आहे. या सर्व देशांच्या प्रमुखांना भारतात आणणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा धोरणात्मक विजय मानला जात आहे. […]

जी-20 देशांकडून भारताची ही विनंती मान्य
Follow us on

ब्यूनस आयर्स, अर्जेंटिना : 2022 च्या जी-20 देशांच्या संमेलनाच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. जी-20 हा जगातिल प्रमुख 20 अर्थव्यवस्थांचा समूह आहे. या सर्व देशांच्या प्रमुखांना भारतात आणणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा धोरणात्मक विजय मानला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्जेंटिनाच्या राजधानीत सुरु असलेल्या जी-20 परिषदेदरम्यानच भारताला यजमानपद मिळाल्याची घोषणा केली. 2022 च्या जी-20 परिषदेचं यजमानपद इटलीला मिळणार होतं. पण ते भारताला देण्यात आल्यामुळे मोदींनी इटलीच्या प्रमुखांचे आभारही मानले. यासोबतच त्यांनी जी-20 देशांच्या सर्व प्रमुखांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं.

 

2022 हे वर्ष भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण, याच वर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या खास वर्षात भारत जी-20 देशांचं स्वागत करण्यास उत्सुक आहे. जगातील वेगाने वाढणाऱ्या सर्व अर्थव्यवस्थांनी भारतात यावं, भारताचा समृद्ध इतिहास आणि विविधता जाणून घ्यावी, तसेच भारताच्या आदरातिथ्याचा अनुभव घ्या, अशा शब्दात मोदींनी जी-20 देशांना निमंत्रण दिलं.

जी-20 जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचा समूह आहे, ज्यात अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, युरोपीय संघ, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन आणि अमेरिका यांचा यामध्ये समावेश आहे.