भारत रशियाकडून तेल खरेदी करणार ? सरकारने स्पष्टच सांगितले की,’आम्ही आधीही खरेदी…

रशियन तेल खरेदी संदर्भात भारताने आपले धोरण स्पष्ट केले आहे. भारतावर कोणताही दबाव नाही, आम्ही आधीही रशियाकडून तेल खरेदी करत होतो आणि आता ही त्याच प्रकारे तेल खरेदी करणार असे भारताने स्पष्ट केले आहे.

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार ? सरकारने स्पष्टच सांगितले की,आम्ही आधीही खरेदी...
Putin, modi and trump
| Updated on: May 18, 2026 | 10:53 PM

भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेने दिलेली सूट वाढवण्यात आली आहे.  त्यामुळे भारताला या संकटात मोठा दिलासा मिळणार आहे. रशियाकडून तेल खरेदीवर अमेरिकेचे निर्बंध येण्या आधीही आम्ही तेल खरेदी करत होतो, सूट दिल्यानंतरही खरेदी करत होतो आणि आताही खरेदी करणार आहे असे पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सोमवारी सांगितले आहे. त्या म्हणाल्या की आमच्यासाठी तेल खरेदी करण्याचा निर्णय व्यावसायिक निर्णय आहे.सध्या कच्च्या तेलाची कमतरता नाही. पुरेसे तेल वारंवार बुक केलेले आहे.सूट असो किंवा सूट नसो, याने काहीही फरक पडत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

पश्चिम आशियातील संकट गेल्या अडीच महिन्यांपासून जारी आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझची स्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल, नैसर्गिक गॅस आणि एलपीजीच्या किंमतीत वाढ झालेली दिसत आहे. या कारणामुळे आमच्या कच्चे तेल, एलपीजी आणि नैसर्गिक गॅसच्या आयातीवर देखील परिणाम झाला आहे.मात्र, आमच्या रिफायनरी सामान्य रुपाने काम करत आहे आणि आमच्याकडे पर्याप्त कच्च्या तेलाचा साठा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जगासाठी स्पष्ट संदेश

रशियन तेल खरेदीवर सरकारने जे सांगितले याचा स्पष्ट अर्थ हा आहे की भारताने स्पष्ट संकेत दिला आहेत तो रशियाकडून स्वस्तातले कच्चे तेल खरेदी करणे सुरुच ठेवणार आहे. मग अमेरिकेचे निर्बंध असो किंवा नसो. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकारी सुजाता शर्मा यांच्या मते देशाकडे कच्चे तेलाचे भंडार सुरक्षित आहे. यात तात्काळ कोणत्या कमतरतेचा धोका नाही. मात्र, सरकारी तेल कंपन्यांना रोजचा तोटा सहन करावा लागत आहे. कारण आंतरराष्ट्रीय किंमती आणि घरगुती किरकोळ किंमत यात संतुलन करावे लागत आहे.

मार्केटसाठी स‍िग्‍नल

दुसऱ्या स्तरावर हा बाजारासाठी सिग्नल आहे. म्हणजे ऊर्जा बाजाराला दिलेला स्पष्ट संदेश आहे की भारत आपल्या आर्थिक हितांना प्राधान्य देणार आहे. स्वस्तातले रशियन तेल भारताच्या आयात खर्चात नियंत्रित करण्यास मदत करते. मात्र, निर्बंधांमुळे पुरवठा बाधित झाल्यावर रिफायनरीवर दबाव वाढू शकतो. आणि जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंटच्या किंमतीतील चढ-उतार येऊ शकतो. एकूण स्थिती हे सांगते की भारत ऊर्जा सुरक्षा आणि कमी खर्च यास अधिक महत्व देत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us