…तर तुर्कीचा खेळ खल्लास, भारताच्या ‘या’ छोट्या निर्णयानं पाकिस्तानच्या मित्राचा गेम झालाच म्हणून समजा!
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाची स्थित आहे. याच तणावादरम्यान तुर्की या देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला. ही बाब समोर आल्यानंतर आता भारतात तुर्कीने उत्पादित केलेल्या वस्तुंवर बहिष्कार टाकला जात आहे. यामध्ये विशेषत: सफरचंदांचा समावेश आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाची स्थित आहे. याच तणावादरम्यान तुर्की या देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला. ही बाब समोर आल्यानंतर आता भारतात तुर्कीने उत्पादित केलेल्या वस्तुंवर बहिष्कार टाकला जात आहे. यामध्ये विशेषत: सफरचंदांचा समावेश आहे. हीच बाब लक्षात घेता भारताने जर एक छोटा निर्णय घेतला तर तुर्की या देशाल मोठा फटका बसू शकतो.
तुर्कीने केली पाकिस्तानला मदत
भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर हल्ले केले. याच हल्ल्यांसाठी तुर्कीने पाकिस्तानला ड्रोनच्या पुर्ततेसह इतर मदत केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच आता भारतात तुर्कीच्या उत्पादनांवर बॉयकॉटचा ट्रेंण्ड चालू झाला आहे.
तुर्कीतून किती सफरचंद आयात केले जातात?
मिळालेल्या माहितीनुसार 2021-22 साली 563 कोटी रुपयांची, 2022 -23 मध्ये 739 कोटी रुपयांची तर 2023-24 साली 821 कोटी रुपयांचे सफरचंदं तुर्कीतून भारतात पाठवण्यात आली होते. सफरचंदांच्या निर्यातीमध्ये तुर्की हा देश प्रत्येक वर्षांत प्रगती करताना दिसतोय. याचा परिणाम भारतात सफरचंदांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांवर पडतोय.
तुर्कीकडून आयात करण्यात येणारे सफरचंद त्याची गुणवत्ता आणि किमतीमुळे भारतात प्रसिद्ध आहेत. मात्र गेल्या काहि दिवसांपासून तुर्कीतील सफरचंदांवर बहिष्कार टाकण्यात येतोय. याच कारणामुळे तुर्कीतील सफरचंदांची मागणी 50 टक्क्यांनी घटली आहे. बहिष्कारामुळे व्यापारी आता काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, वॉशिंग्टन, न्यूझिलंड, इराण येथून सफरचंद मागवत आहेत.
तुर्कीला होणार मोठे नुकसान?
भारतीय नागरिकांच्या बहिष्काराच्या धोरणामुळे तुर्कीला सध्या मोठा आर्थिक फटका बसतोय. ऑफ सिझन असले तरी भारतीय बाजारपेठेत तुर्कीच्या सफरचंदांची मोठी मागणी असते. भारतातील सफरचंद मात्र वर्षभरातील काही महिन्यांपुरतेच उपलब्ध असतात.
दरम्यान, असे असले तरी भारतीय नागरिक सध्या तुर्कीतील सफरचंद बॅन करण्याचा निर्णय घेतला तर तुर्कीला मोठा फटका बसू शकतो. अद्याप भारताने तसा कोणताही निर्णय घेतला नाही.
