Saudi Arabia-Pakistan : सौदी अरेबिया-पाकिस्तानमधील खळबळजनक करारानंतर भारताने सौदीच्या शेजाऱ्यासोबत मिळून साधला मोठा डाव

Saudi Arabia-Pakistan : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी गुरुवारी एक डील केली.या करारानुसार दोन्ही देशांपैकी एका देशावर कोणी हल्ला केला, तर तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल.

Saudi Arabia-Pakistan : सौदी अरेबिया-पाकिस्तानमधील  खळबळजनक करारानंतर भारताने सौदीच्या शेजाऱ्यासोबत मिळून साधला मोठा डाव
pakistan-saudi pact
| Updated on: Sep 19, 2025 | 12:09 PM

सौदी अरेबियाने पाकिस्तान सोबत डिफेन्स करार करुन मध्य पूर्वेपासून आशिया खंडात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्याचवेळी आता भारत सुद्धा मिडिल ईस्टमधील संयुक्त अरब अमिरातीसोबत मोठा करार करण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी या संदर्भात भारताचे व्यापार मंत्री पीयूष गोयल यांची यूएईच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक झाली.संयुक्त अरब अमीरात मिडिल ईस्टमधील एक महत्वाचा देश आहे. इस्रायलसोबत UAE चा अब्राहम करार झाला आहे. अलीकडेच दोहा येथे कतरवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याविरोधात एक बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी UAE ने कतरमध्ये आपला एकही मोठा नेता पाठवला नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी गुरुवारी एक डील केली.या करारानुसार दोन्ही देशांपैकी एका देशावर कोणी हल्ला केला, तर तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. म्हणजे हे नाटोसारख आहे. नाटो गटातील कुठल्या एका देशावर हल्ला झाल्यास तो संपूर्ण नाटोवरील हल्ला मानला जातो. सौदीने कतरवरील इस्रायली हल्ल्यानंतर हा करार केला आहे.

त्या बदल्यात सौदी पाकिस्तानसाठी काय करणार?

या करारामुळे सौदी अरेबियाला पाकिस्तानच अणू बॉम्बच कवच मिळालं आहे. त्या बदल्यात सौदी पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करेल. सध्या सौदीचा प्रयत्न पाकिस्तानच्या रेल्वे,हेल्थ आणि एनर्जी सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याचा आहे.

भारतासाठी हा करारा महत्वाचा का?

सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये जी डील झालीय, तो करार भारताच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे. पाकिस्तान आणि भारतामध्ये जुनं शत्रुत्व आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत चार युद्ध झाली आहेत. चारही युद्ध भारताने जिंकली. त्यानंतर अलीकडच्या काही वर्षात सातत्याने पाकिस्तानवर स्ट्राइक केले आहेत.भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर सौदीने नेहमी तटस्थतेची भूमिका घेतली.

भारत आणि UAE मध्ये काय करार होणार?

भारत आणि संयुक्त अरब अमीरातमध्ये अवकाश आणि समुद्री क्षेत्रात गुंतवणूकीबद्दल चर्चा सुरु आहे. दोन्ही देश आधीपासूनच ऊर्जा आणि टेक्नॉलोजी क्षेत्रात मिळून काम करतायत. आता अवकाश आणि समुद्री क्षेत्रातील गुंतवणूकीमुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील. यूएई अवकाश आणि समुद्री क्षेत्रात खूप मजबूत स्थितीमध्ये आहे. मिडिल ईस्टमधला UAE पहिला देश आहे, जो अवकाशाबाबत 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. मंगळ मिशनवर सुद्धा संयुक्त अरब अमीरातच काम सुरु आहे. दुबईमधील जबल अली पोर्ट आखातातील मोठा पोर्ट आहे. परशियनच्या खाडीत व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा यूएईची खूप मदत होऊ शकते.