
अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठी कारवाई करत थेट राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण करत त्यांना अमेरिकेत आणले. व्हेनेझुएला आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून तणाव होता. अमेरिकेने मोठा हल्ला करत थेट व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांचे अपहरण केले. अमेरिकेत आता त्यांच्यावर खटला सुरू आहे. अमेरिकेने ज्यापद्धतीने व्हेनेझुएलावर हल्ला केला ते अत्यंत चुकीचे असल्याचे अनेक देशांनी म्हटले. व्हेनेझुएलाच्या तेलावर आता पूर्णपणे अमेरिकेचे नियंत्रण आहे. व्हेनेझुएलाचे कच्चे तेल अमेरिका जगभर विकणार आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर प्रचंड दबाव असून रशियाकडून तेल खरेदी भारताने बंद करावी, याकरिता ते विविध प्रकारे दबाव टाकत आहेत. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. भारताने आता रशियाकडून जवळपास तेल खरेदी बंद केल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा देखील थांबली आहे. भारताने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करावे, असा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला आहे. भारतातील ऊर्जा मागणी खूप जास्त आहे. रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याने तुटवडा निर्माण होऊ शकतो. या तुटवडा भरून काढण्याकरिता भारताने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करावी, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
अमेरिकेच्या म्हणण्याप्रमाणे जर भारताने व्हेनेझुएलाचे तेल खरेदी केले तर लवकरच भारत आणि अमेरिकेत व्यापार करार देखील होऊ शकतात. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने नुकताच भारताला मोठे संकेत दिले असून तुम्ही व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करू शकता. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने मोठ्या प्रमाणात रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यात सुरूवात केली.
त्याचे मुख्य कारण म्हणजे रशिया भारताला अत्यंत कमी किंमतीत हे तेल देत होता. मात्र, ही गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांच्या पचणी पडली नाही आणि त्यांनी यावरून भारतावर काही गंभीर आरोप केले. भारताने आता हळूहळू करून रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचे कळतंय. रशियाचे तेल भारतात येत आहे. मात्र, मार्ग आणि कंपन्या बदलल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता भारताने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करावे, ही अमेरिकेची इच्छा आहे.