AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाची घोषणा 12 तारखेला? शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट काय?

Sharad Pawar on NCP Reunion: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी घडत आहे. कालच राष्ट्रवादीचे नेते वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तर आज सकाळी पत्रकार परिषद घेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. अनेक गोप्यस्फोट केले आहेत.

Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाची घोषणा 12 तारखेला? शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 31, 2026 | 10:35 AM
Share

Sharad Pawar on NCP Reunion: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. कालच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे वर्षावर पोहचले होते. त्यांनी सव्वातास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. दरम्यान आज सकाळी पत्रकार परिषद घेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या विषयावर मोठे भाष्य केले. त्यांनी गौप्यस्फोटही केले. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, यावर त्यांनी स्पष्ट मत मांडले.

राष्ट्रवादीतील घडामोडींविषयी कानावर हात

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीविषयी आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. हा त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्याला याविषयी कोणतीही माहिती नसल्याचे वा त्यांच्या पक्षाकडून कोणतीही माहिती आली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आज सकाळी आपल्याला हा विषय समजल्याचे ते म्हणाले. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईतील राजकीय घडामोडींविषयी अलिप्त असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी एकत्रि‍करणावर मोठे भाष्य

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रि‍करणाच्या चर्चांना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याची अजितदादांची इच्छा होती. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. महापालिका निवडणुकीनंतर हा निर्णय घेण्यात येणार होता. पण जिल्हा परिषद निवडणूक लागल्या. या निवडणुकीत एकाच चिन्हावर, घड्याळावर दोन्ही राष्ट्रवादीने लढावे अशी दादांची इच्छा होती. गेल्या दोन दिवसांपासून याविषयीच्या बातम्या आल्या. त्याला दोन्ही राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनी सुद्धा दुजोरा दिला. अशा चर्चा सुरू होत्या असे त्यांनी सांगितले.

दरम्यान आज सकाळी शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी विचारले असता शरद पवार यांनी त्यावर मोठं भाष्य केलं. अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. अजितदादादा आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू होती. मी या चर्चेत नव्हतो असे पवार यांनी स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती. याविषयीचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता असा गौप्यस्फोटही पवारांनी केला. तर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत खंड पडल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही इच्छा होती असे मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केले. दोन्ही पक्षात सुसंवाद राहावा यासाठी सकारात्मक चर्चा सुरू होती असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता याविषयीचा निर्णय दोन्ही बाजूचे नेते करतील असे त्यांनी स्पष्ट केले.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं