
पहलगाम दहशतवादी हल्ला ही आपली मोठी चूक आहे, हे पाकिस्तानला कळून चुकलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारत कसा घेणार? पाकिस्तान याच चिंतेमध्ये आहे. तिथल्या सत्ताधाऱ्यांना, नेत्यांना, माजी सैनिकांना, माजी राजनैतिक अधिकाऱ्यांना सध्या दिवस-रात्र फक्त युद्धाची स्वप्न पडत आहेत. भारत यावेळी कुठल्या बाजूने? कशी कारवाई करणार? हेच पाकिस्तानला समजत नाहीय. त्यामुळे पाकिस्तानमध्ये बेताल वक्तव्यांचा पूर आला आहे. तिथली मंडळी सतत अणूबॉम्बचा जप करतच आहेत. पण आता तिथल्या एका जाणकारे माणसाने भारत कधी हल्ला करेल? ती तारीख जाहीर केली आहे. पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी त्यांच्या X अकाऊंटवर भारत कधीपर्यंत कारवाई करणार? ते जाहीर केलय. अब्दुल बासित हे पाकिस्तानचे निवृत्त मुत्सद्दी असून त्यांनी भारतात पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे.
“रशियाच्या विजय उत्सवानंतर भारत 10 किंवा 11 मे रोजी पाकिस्तान विरुद्ध मर्यादीत स्वरुपाची कारवाई करु शकतो” असं पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हटलं आहे. सध्या अब्दुल बासित यांनी भारतीय वृत्तवाहिन्यांवर मुलाखती देण्याचा सपाटा लावला आहे. भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या सध्याच्या स्थितीबद्दल ते सातत्याने मत प्रदर्शन करत आहेत. काही दिवसांपूर्वी एका भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अब्दुल बासित म्हणालेले की, “भारत काही ना काही कारवाई करणार, या बद्दल माझ्या मनात कुठलाही संशय नाही. कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये जाहीर केलेलं की, ते कारवाई जरुर करणार”
India will likely carry out its limited misadventure against Pakistan after Victory Celebrations in Russia. Perhaps on 10-11 May.
— Abdul Basit (@abasitpak1) May 6, 2025
‘पाणी नाही, तर रक्त वाहिल’
“भूतकाळात पाहिलं तर 2016 साली उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राइक केला होता. भारतातील मीडिया, सैन्य अधिकारी आणि संरक्षण एक्सपर्टनुसार भारत हल्ला जरुर करणार” असं अब्दुल बासित म्हणाले होते. “मागच्या काही हल्ल्यांचा पॅटर्न बघितला तर 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत 1 ते 3 मे दरम्यान पहिल्या आठवड्यात कारवाई करु शकतो. भारताने अशी कुठली कारवाई केल्यास आम्ही तयार आहोत. पाकिस्तानही जोरदार प्रत्युत्तर देईल” असं अब्दुल बासित म्हणाले होते.