
अमेरिकेतील भारतीय वंशाचे एक प्रमुख अमेरिकी विश्लेषक आणि दक्षिण आशियातील निती सल्लागार एशले टेलिस यांना अटक करण्यात आली आहे. एशले टेलिस यांना गोपनीय कागदपत्र बाळगणं आणि चिनी सरकारी अधिकाऱ्यांना भेटण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 64 वर्षांच्या एशले टेलिस यांनी राष्ट्रीय संरक्षणासंबंधीची माहिती बेकायदरित्या आपल्याकडे ठेवली असं न्यायालयाने म्हटलं आहे. वर्जिनियातील वियना येथील त्यांच्या घरातून एकाहजार पानांपेक्षा जास्त गुप्त कागदपत्र मिळाली आहेत. टेलिस हे अमेरिका-भारत संबंधांसाठी प्रतिष्ठीत आवाज मानला जातात. त्यांनी अनेक प्रशासनांमध्ये काम केलं आहे.
सुरक्षा यंत्रणांनी शुक्रवारी टेलिस यांना अटक केली आहे. औपचारिकरित्या सोमवारी त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. टेलिस यांनी तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत काम केलं आहे. FBI च्या एका प्रतिज्ञापत्रात त्यांना परराष्ट्र विभागाचे सल्लागारआणि पेंटागनच्या नेट असेसमेंट कार्यालयाचे एक ठेकेदार म्हणून दाखवलं आहे. ते वॉशिंग्टन थिंक टँक, कार्गेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसचे वरिष्ठ फेलो आहेत.
2001 साली ते अमेरिकी सरकारमध्ये सहभागी झाले
टेलिस एक सीनियर निती रणनितीकार आहेत. 2001 साली ते अमेरिकी सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी भारत आणि दक्षिण आशियावर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोन्ही प्रशासनांना सल्ले दिले होते. ट्रम्प प्रशासन आणि राष्ट्रीय गोपनीय संचालक तुलसी गबार्ड यांनी गोपनीय माहितीचा दुरुपयोग करण्याबद्दल कठोर भूमिका घेतली आहे.
कुठली माहिती चोरल्याचा आरोप
टेलिस यांचा जन्म मुंबईत झाला. शिकागो यूनिवर्सिटीतून PhD करण्याआधी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. शिकागो यूनिवर्सिटीतून पॉलिटिकल सायन्स या विषयातून त्यांनी MA केलं. मागच्या काही वर्षांपासून टेलिस अमेरिका-भारत-चीन नीतिगत क्षेत्रात एक स्थायी सदस्य बनले आहेत. पॅनलमधील एक नावाजलेला चेहरा आणि सम्मानित आवाज म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या लेखनावर वॉशिंगटन, नवी दिल्ली आणि बीजिंगमधून बारीक लक्ष ठेवलं जायचं. टेलिस अमेरिकी सैन्य विमानाच्या क्षमतेसंदर्भात गोपनीय फाइल एका चामड्याच्या ब्रीफकेसमधून इमारतीच्या बाहरे नेताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. कोर्टाच्या डॉक्यूमेंटमध्ये असं म्हटलं आहे.