America Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा झटका, या क्षेत्रात कोट्यवधीचे नुकसान, भारतीय कंपन्यांत मोठी खळबळ, आता…

America Tariff : डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून प्रत्येक गोष्टीवर टॅरिफ लावताना दिसत आहेत. फक्त टॅरिफच नाही तर त्यांनी म्हटले की, माझ्या आवडतीचा शब्द टॅरिफ आहे. टॅरिफमुळे श्रीमंत होता येते. आता एक धक्कादायक अहवाल पुढे आलाय.

America Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा झटका, या क्षेत्रात कोट्यवधीचे नुकसान, भारतीय कंपन्यांत मोठी खळबळ, आता...
Donald Trump
| Updated on: Oct 02, 2025 | 3:07 PM

भारतामध्ये मोठ्या औषध कंपन्या आहेत आणि भारताला जगातील फार्मसी म्हणूनही ओळखले जाते. फक्त अमेरिकाच नाही तर भारतीय औषध कंपन्या या जगातील अनेक देशात मोठा व्यवयास करतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व फार्मा वस्तूंवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला. भारतातील अशा काही फार्मा कंपन्या आहेत, ज्यांची अत्यंत मोठी बाजारपेठ अमेरिका आहे. 100 टक्के टॅरिफमुळे त्यांच्यावर थेट परिणाम झाला. 2023-24 या आर्थिक वर्षात भारताने 27.85 अब्ज डॉलर्सची औषधे आणि फार्मा उत्पादने निर्यात केली. अमेरिकेने जरी फार्मा वस्तूंवर इतका मोठा टॅरिफ लावला असला तरीही अनेक देशांमध्ये भारताच्या फार्मा वस्तूंची निर्यात केली जाते. अमेरिकेने फार्मा वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ लावून थेट धक्काच दिला. हा टॅरिफ लावून काही दिवस होत असतानाच मोठे नुकसान भारतीय फार्मा कंपन्यांचे झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

संयुक्त राष्ट्रांच्या कॉमट्रेड डेटाबेस ऑफ ग्लोबल ट्रेड स्टॅटिस्टिक्सनुसार, गेल्या वर्षी भारताने अमेरिकेला $9 अब्ज किंमतीची औषध उत्पादने निर्यात केली. ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेत औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांना या शुल्कातून सूट मिळणार नाही. हा पण ज्या कंपन्या स्वतःचे प्लांट बांधण्यास सुरुवात केली आहे त्यांनाही या शुल्कातून सूट मिळेल. मात्र, भारतीय कंपन्या जास्त करून अमेरिकेत आपल्या वस्तूंची निर्यात करतात. टॅरिफमुळे कोट्यावधींचे नुकसान होतंय.

हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानंतर काही भारतीय फार्मा कंपन्यांचे शेअर्स देखील पडताना दिसली. आता फार्मा कंपन्या या टॅरिफमधून मार्ग काढताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर H-1B व्हिसावर मोठे शुल्क लादले. यासर्व गोष्टींचा जितका परिणाम भारतावर झाला नाही, त्याच्या कितीतरी पट जास्त परिणाम फॉर्माच्या वस्तूंवर लावण्यात आलेल्या टॅरिफचा पडला.

अमेरिका ही भारतासाठी नक्कीच मोठी बाजारपेठ आहे. 100 टक्के टॅरिफ भरून आपल्या वस्तू अमेरिकेत पाठवणे म्हणजे मोठे आव्हान कंपन्यांपुढे आहे. अमेरिकेतही याचा थेट परिणाम दिसतोय. फार्माच्या वस्तूंच्या अमेरिकेत किंमती वाढण्याचे दाट संकेत आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. मात्र, अमेरिकेत आयात होणाऱ्या प्रत्येक फार्माच्यया वस्तूवर टॅरिफ लावण्यात आला.