डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका, तो प्रस्ताव मान्य नाहीच, जगासमोर पडले तोंडावर, अमेरिकेच्या..
डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत दावा करताना दिसत आहेत की, त्यांनी जगातील मोठी सात युद्ध थांबवली आहेत. ज्यामध्येच त्यांना हमास-इस्त्रायल युद्धात 20 कलमी प्रस्ताव ठेवला. ज्यावर हमासने अजूनही प्रतिसाद दिला नाही.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले आहे. या युद्धात मध्यस्थी करण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 कलमी प्रस्ताव दोन्ही देशांपुढे ठेवला. विशेष म्हणजे या प्रस्तावासाठी अनेक मुस्लिम देश अमेरिकेसोबत जोडले गेले आणि त्यांनी मिळून प्रस्ताव तयार केला. यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान अमेरिकेला गेले आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवलेला हमाससोबतचा युद्धबंदीचा प्रस्ताव मान्य केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी हमासला 72 तासांचा वेळ दिला. मात्र, हमासने अजूनही अमेरिकेच्या 20 कलमी प्रस्ताव मान्य केला नाही. हमासकडून प्रस्ताव मंजूर केला जात नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट बघायला मिळाला. त्यांनी स्पष्ट म्हटले की, पुढे जे काही होईल, त्याला फक्त आणि फक्त हमासच जबाबदार असणार.
आम्ही इस्त्रायलला पूर्ण सूट देणार आहोत आणि त्यांच्या मागे उभा राहणार असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले. आता अमेरिकेच्या प्रस्तावाबद्दल हमासकडून मोठा हस्तक्षेप घेतल्याची माहिती पुढे येतंय. अमेरिकेने दिलेला युद्धबंदीचा प्रस्ताव आम्हाला मान्य असल्याचे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अगोदरच स्पष्ट केले. गाझामधील शांतीसाठी त्यांनी सहमती दाखवली.
रिपोर्टनुसार, फिलिस्तीनी सुत्रांनी सांगितले की, हमासने डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20 कलमी प्रस्तावावर आक्षेप घेतलाय. त्यांनी हा प्रस्ताव मान्य करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. हमासच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव मान्य नाही. आम्हाला त्या प्रस्तावात काही बदल हवे आहेत. हमासच्या नेत्यांना गाझापट्टीवर इस्त्रायलकडून पूर्णपणे शांतीची आंतरराष्ट्रीय हमी हवी आहे.
हमासच्या लोकांचे म्हणणे आहे की, गाझाच्यामध्ये आणि बाहेर त्यांच्या लोकांवर हल्ला झाला नाही पाहिजे आणि त्याची आंतरराष्ट्रीय हमी पाहिजे. भविष्यात हमासच्या लोकांची हत्या केली जाणार नाही. इस्त्रायल युद्धबंदी प्रस्तावावर सही करण्यास तयार असताना यावर हमासने हस्तक्षेप घेतला आहे. आता अमेरिका यादरम्यान काय भूमिका घेते, याकडे सर्वांच्या नजरा असल्याचे बघायला मिळतंय. इस्त्रायल-हमास युद्ध थांबणार का? याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत.
