AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासाठी गुड न्यूज… इराण-अमेरिका युद्ध संपताच घरगुती गॅस सिलेंडर… काय आहे मोठी अपडेट?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दोन आठवडे युद्धविरामाची घोषणा केली असून, इराणने देखील होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास मान्यता दिली आहे... म्हणून भारतासाठी मोठी गुडन्यूज आहे... जाणून घ्या काय आहे मोठी अपडेट...

भारतासाठी गुड न्यूज… इराण-अमेरिका युद्ध संपताच घरगुती गॅस सिलेंडर… काय आहे मोठी अपडेट?
| Updated on: Apr 08, 2026 | 9:24 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील सीजफायरनंतर, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती पूर्ववत होऊ शकते. जेथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दोन आठवडे युद्धविरामाची घोषणा केली आहे, तेथे इराणने देखील होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली आहे. सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात देखील इंधनाचा तुडवडा भासले. अशात, पश्चिम आशियातील तणावामुळे गंभीर इंधन संकटाचा सामना करणाऱ्या भारतासाठी ही घोषणा एक दिलासादायक बातमी ठरू शकते.

भारतीयांना कधी मिळणार दिलासा?

डोनाल्ड ट्रंप म्हणाले, ‘पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाद शरीफ आणि फिल्ड मार्शल असीर मुनीर यांच्यासोबत झालेल्या चर्चांच्या आधारावर, त्यांनी मला आज रात्री इराणवर नियोजित असलेला विनाशकारी हल्ला थांबवण्यासाठी विनंती केली. एवंढच नाही तर, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ आणि सुरक्षितपणे खुली करण्याच्या बदल्यात, मी दोन आठवड्यांसाठी इराणवरील बॉम्बहल्ले आणि हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली आहे.

रिपोर्टनुसार, इरान देखील सीजफायरसाठी तयार झाला आहे. इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी मान्य केलं आहे की, तेहरानकडून मागण्या मान्य करण्यात आल्या आहे… त्यांनी सांगितले की, इराणी सैन्याच्या समन्वयाने, दोन आठवड्यांसाठी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले दोन एलपीजी टँकर होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून भारतीय बंदरांच्या दिशेने निघाले आहेत, तर इतर 16 मालवाहू जहाजे पर्शियन आखातात अडकून पडली आहेत, असं अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितलं.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितल्यानुसार 46 हजार 650 टन एलपीजी घेऊन जाणारा ‘ग्रीन सान्वी’ हा टँकर 7 एप्रिल रोजी भारतात पोहोचेल असं सांगण्यात आलं होतं. तर 15 हजार 500 टन गॅस घेऊन जाणारा ‘ग्रीन आशा’ हा टँकर 9 एप्रिल रोजी भारतीय किनारपट्टीवर पोहोचेल.

भारताला मिळणार मोठा दिलासा…

भारत आपल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या गरजेपैकी सुमारे 60 टक्के गरज आयातीद्वारे भागवतो, त्यापैकी सुमारे 90 टक्के गॅस पश्चिम आशियातून येतो. गेल्या काही दिवसांपासून देशात LPG सिलेंडर आणि इंधनाचा तुटवडा भासत होता. पण आता दोन आठवड्यांसाठी युद्ध थांबल्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाडे सुरक्षितपणे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळणार आहे…

Follow Us
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...