Iran attacks Israel : इस्रायलच्या वॉर कॅबिनेटच मत इराणवर प्रतिहल्ला करावा, पण…बैठकीत काय घडलं?

| Updated on: Apr 15, 2024 | 9:12 AM

Iran attacks Israel : इराणचा इस्रायलवरचा हल्ल्याचा प्रयत्न फसला. पण त्यांनी पहिल्यांदा असं धाडस केलय. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या वॉर कॅबिनेटची तातडीची बैठक पार पडली. त्यात वॉर कॅबिनेटच्या सदस्यांच काय मत आहे? अमेरिकेने इस्रायलला काय सांगितलय? त्या बद्दल जाणून घ्या.

Iran attacks Israel : इस्रायलच्या वॉर कॅबिनेटच मत इराणवर प्रतिहल्ला करावा, पण...बैठकीत काय घडलं?
Iran attacks on Israel
Image Credit source: AFP
Follow us on

इराणने काल इस्रायलवर मोठा हवाई हल्ला केला. इराणने जवळपास 300 मिसाइल आणि ड्रोन्स इस्रायलच्या दिशेने डागले. पण इस्रायलने मित्र देशांच्या मदतीने वेळीच हल्ल्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. टेक्नोलॉजीमध्ये बऱ्याच पुढे असलेल्या इस्रायलने हवेतच इराणी मिसाइल आणि ड्रोन्स नष्ट केले. मोठं नुकसान करण्याची इराणची योजना धुळीस मिळवली. इराणचा हल्ला फसला पण फरक इतकाच आहे की, इराणने पहिल्यांदाच आपल्या भूमीवरुन इस्रायलवर थेट अशा प्रकारचा हल्ला करण्याच धाडस केलं. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या अध्यक्षतेखाली इस्रायलच्या वॉर कॅबिनेटची बैठक पार पडली. पुढच पाऊल काय उचलायच त्या संबंधी या बैठकीत काही निर्णय झाला नाही.

इस्रायली नेत्यांनी इराणचा हल्ला परतवून लावण्याच श्रेय आंतरराष्ट्रीय लष्करी आघाडीला दिलं. समन्वयामुळे हे शक्य झालं. रणनितीक भागीदारीची ही सुरुवात असल्याच इस्रायलने म्हटलं आहे. इराणने इस्रायलच्या दिशेने 300 मिसाइल्स आणि ड्रोन्स डागली होती. मित्र देशांच्या मदतीशिवाय इतका मोठा हल्ला परतवून लावण इस्रायललाही शक्य नव्हतं. आमच्या सैन्याने यूएस युरोपियन कमांडच्या मदतीने 13 आणि 14 एप्रिलला इराण आणि येमेनमधून इस्रायलच्या दिशेने डागण्यात आलेली 80 UAV आणि सहा बॅलेस्टिक मिसाइल्स नष्ट केली. अमेरिकन सेंट्रल कमांडने ही माहिती दिली.

संयम बाळगण्याच आवाहन

इराणने डागलेली ड्रोन्स आणि मिसाइल 99 टक्के हवेतच नष्ट करण्यात आली. इस्रायलच्या बाजूला कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. आम्ही आमच उद्दिष्ट्य साध्य केलय असं सांगून इराणने युद्धाची तयारी नसल्याच स्पष्ट केलय. इस्रालयचे सहकारी अमेरिका आणि युरोपने संयम बाळगण्याच आवाहन केलं आहे. सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये 1 एप्रिलला इराणच्या दूतावासावर इस्रायलकडून एअर स्ट्राइक करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर हा ड्रोन हल्ला केला.

इस्रायलच्या वॉर कॅबिनेटच काय ठरलय?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय वॉर कॅबिनेटच मत आहे की, “इराणला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. फक्त हल्ल्याची वेळ आणि तीव्रता किती असावी, यावर मतमतांतर आहेत” रॉयटर्सने हे वृत्त दिलय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बेंजामिन नेतान्याहू यांना स्पष्ट केलय की, “इस्रायलने आता प्रत्युत्तराची कारवाई केली, तर लष्करी मदत मिळणार नाही. वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने ही माहिती दिली”