Iran Missile Range : इराणचं नवीन बॅलेस्टिक मिसाइल, रेंजचा दावा खरा निघाला तर नक्कीच इस्रायल-अमेरिकेला घाम फुटेल

Iran Missile Range : इराणने नवीन आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइल विकसित केल्याचा दावा केला आहे. इराणने या मिसाइलची जी रेंज सांगितली आहे, तो दावा जर खरा निघाला तर नक्कीच अमेरिकेच टेन्शन वाढणार आहे. इस्रायल विरुद्ध युद्धाच्यावेळी इराणी मिसाइल्सची ताकद दिसली होती.

Iran Missile Range : इराणचं नवीन बॅलेस्टिक मिसाइल, रेंजचा दावा खरा निघाला तर नक्कीच इस्रायल-अमेरिकेला घाम फुटेल
Iran Missile
Image Credit source: X/Tansim News
| Updated on: Nov 08, 2025 | 2:04 PM

इराणने नवीन आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइल विकसित केल्याचा दावा केलाय. ही मिसाइल तयार असून त्याची रेंज 10,000 किलोमीटर आहे. हा दावा खरा असेल, तर ही मिसाइल युरोप आणि अमेरिकेच्या काही भागांपर्यंत नक्कीच पोहोचेल. ही बातमी इराणची न्यूज एजन्सी तस्नीमने 7 नोव्हेंबरला दिली. एक्सवरुन सुद्धा ही माहिती शेअर करण्यात आली आहे. पाश्चिमात्य देशांनी इराणच्या या दाव्यावर अजून शिक्कामोर्तब केलेलं नाही. ही मिसाइल सेवेसाठी तयार आहे. एका व्हिडिओमध्ये ईराणी रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सने (IRGC) कॉमेंट्रीसह सायलो मिसाइल, मोबाइल लॉन्चर आणि जुन्या लॉन्चिंगच फुटेज दाखवलं. मिसाइल पूर्णपणे विकसित झालय, असं व्हिडिओ पाहून वाटतं. पण याला ठोस आधार नाहीय. सॅटलाइट इमेज किंवा 10,000 किमी टेस्ट फ्लाइटचा व्हिडिओ.

आधी इराणकडे 2,000 किलोमीटर रेंजपर्यंतची मिसाइल असल्याचा दावा करण्यात येत होता. आखाती देश, इस्रायल आणि पूर्व युरोपपर्यंत या मिसाइलची मारक क्षमता होती. पण आता 10,000 हजार किलोमीटरचा दावा हा मोठा बदल आहे. इराण म्हणतोय तस खरच असं मिसाइल त्यांनी विकसित केलं असेल, तर अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी, न्यू यॉर्क ही शहरं त्यांच्या रेंजमध्ये येतील.

खोरमशहर-4 ची मारक क्षमता किती?

इराणची सध्याची मिसाइल्स खोरमशहर-4 ची मारक क्षमता 2,000 ते 3,000 किलोमीटर आहे. 10,000 किमीचा टप्पा गाठण्यासाठी नवीन टेक्नोलॉजी पाहिजे. मिसाइल्सची रेंज वाढवण्यासाठी इराणच्या सॅटलाइट लॉन्च व्हीकल प्रोग्रॅमची मदत होतेय, असं एक्सपर्ट्सच म्हणणं आहे. स्पेस मिशनचा मिसाइल बनवण्यासाठी सुद्धा वापर करता येतो. अमेरिकेच्या संरक्षण विभागानुसार हे दुहेरी वापराचे प्रोग्रॅम आहेत. स्पेस आणि मिसाइल दोन्ही या द्वारे घडवता येतं.

न्यूक्लियर शस्त्र वाहून नेता येईल का?

मिसाइलला रोड-मोबाइल लॉन्चरवर ठेवलं जातं. ते लपवणं सोपं असतं. इराणने अलीकडे सॉलिड-फ्यूल असलेल्या मिसाइल्स निर्मितीवर जोर दिलाय. कारण ते लवकर लॉन्च करता येऊ शकतात. पण 10,000 किलोमीटरच्या रेंजसाठी सॉलिड फ्यूल बनवणं कठीण आहे. इराण नेहमीच त्यांच्या शस्त्रास्त्रांची क्षमता वाढवून चढवून सांगतो. त्यांनी दावा केलाय, पण त्याला बळ देण्यासाठी फ्लाइट डेटा, फुटेज किंवा ट्रॅकिंग नाहीय. वॉरहेड म्हणजे स्फोटकं किती ताकदवान आहेत, न्यूक्लियर शस्त्र वाहून नेता येईल का? या बद्दल स्पष्टता नाहीय.