
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अशातच आता इराणच्या माध्यमांनी दावा केला आहे की एक F-15 लढाऊ विमान होर्मुझ बेटाजवळ पाडण्यात आले आहे. हे जेट शत्रूचे होते आणि दक्षिण भागाच्या वर उड्डाण करत होते अशी माहिती माध्यमांनी दिली आहे. इराणच्या च्या एअर डिफेन्स सिस्टमने जमिनीवरून क्षेपणास्त्र डागून त्याला लक्ष्य केले. सरकारी चॅनेल प्रेस टीव्हीनेही याची माहिती देत एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात जेट कोसळताना दिसत आहे.
इराणच्या या दाव्यावर अमेरिका आणि इस्रायलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या युद्धात अमेरिका आणि इस्रायलला मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. फक्त 21 दिवसांत दोन्ही देशांचे 28 पेक्षा जास्त विमान आणि महागडे लष्करी सिस्टमला फटका बसला आहे. इराणने किमान 17 विमान पाडल्याचा किंवा नुकसान केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या युद्धात अमेरिका आणि इस्रायल बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे.
#BREAKING
An enemy’s F-15 fighter jet was shot down by Iranian air defense systems near Hormuz Island after being intercepted over the country’s southern coast. pic.twitter.com/jmrFuUQKbd— Tehran Times (@TehranTimes79) March 22, 2026
अमेरिकेच्या 16 विमानांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जाते, ज्यामध्ये 12 MQ-9 Reaper drone ड्रोनचा समावेश आहे. एका ड्रोनची किंमत सुमारे 56.5 मिलियन डॉलर असल्याने फक्त ड्रोनमुळेच 500 मिलियन डॉलरपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. याशिवाय 3 F-15 Strike Eagle कुवैतमध्ये चुकून स्वतःच्या फायरिंगमध्ये नष्ट झाले. तर 12 मार्च रोजी इराकमध्ये KC-135 Stratotanker कोसळले, ज्यात 6 जणांचा मृत्यू झाला, आणि आणखी एक KC-135 त्या घटनेत नुकसानग्रस्त झाले.
इराणने 19 मार्च रोजी F-35 Lightning II वर हल्ला केल्याचा दावा केला आहे. अमेरिकन सैन्याने सांगितले की विमानाला आपत्कालीन लँडिंग करावी लागली, मात्र त्यामागील कारण स्पष्ट केले नाही. हा दावा खरा ठरल्यास इतक्या प्रगत जेटवर असा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ ठरेल. इस्रायलचेही एक डझनपेक्षा जास्त ड्रोन इराणच्या हद्दीत नष्ट झाल्याचे सांगितले जाते. अशा प्रकारे दोन्ही देशांचे एकूण 28 विमाने प्रभावित झाले आहेत, हा या दोन्ही देशांसाठी मोठा धक्का आहे.