AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणने तयार केले न्युक्लिअरहून खतरनाक शस्र, हा जिवंत मेंदूचा खेळ काय ?

इराण आर्थिक निर्बंधामुळे आणि धार्मिक प्रवृत्तीमुळे मागासलेला देश वाटत असला तरी त्यांच्या ड्रोन तंत्रज्ञानाने भल्याभल्या देशांना हादरा दिला होता. आता इराण अण्वस्रापेक्षाही धक्कादायक काही तरी करीत आहे.

इराणने तयार केले न्युक्लिअरहून खतरनाक शस्र, हा जिवंत मेंदूचा खेळ काय ?
| Updated on: Jun 27, 2026 | 6:04 PM
Share

अमेरिका एकीकडे इराणच्या अण्वस्रांच्या मागे लागला आहे. या अण्वस्रांमुळे मध्य पूर्वेच्या अनेक देशांना मिसाईल – ड्रोन हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. मात्र, आता यावर आता अमेरिका आणि इराणमध्ये सामंजस्य करार झाला आहे.आणि युद्ध समाप्तीच्या मार्गावर आहे. त्यात एक नवीन बातमी आली असून ती अमेरिकेसाठी एक मोठा झटका सिद्ध होऊ शकते. इराणने असे काही केले आहे. जे चुकीच्या हातात गेले तर ते न्युक्लिअर शस्रापेक्षाही खतरनाक सिद्ध होऊ शकते. इराणचा हा नवा शोध आर्टीफिशियल मेंदूचा आहे. जो एआय नाही तर बीआय आहे. म्हणजे ‘बायोलॉजिकल इंटीलिजन्स’ आहे. हा कोणताही साधारण संगणकीय प्रोग्रॅम नाही तर जीवंत मानवाच्या न्यूरॉन्स पासून तयार झालेले असे नेटवर्क आहे, जे स्वत:चे निर्णय घेऊ शकते आणि मानवी मेंदूसारखे नव्या गोष्टी शिकू शकते.

इराण युद्धग्रस्त असला तरी तेथील संशोधकांनी नवीन शोध लावला आहे. येत्या काळात हा शोध अण्वस्रांपेक्षाही जास्त खतरनाक सिद्ध होऊ शकतो. इराणच्या संशोधकांनी लॅबच्या आत एका जीवंत मानवाच्या पेशींच्या मदतीने एक छोटा कृत्रिम मेंदू तयार केला आहे. ज्याला विज्ञानाच्या भाषेत ‘बायोलॉजिकल इंटेलिजेन्स’ ( BI )  वा ऑर्गेनॉईड इंटेलिजन्स म्हटले जात आहे.हे काही सामान्य कॉम्प्युटर सॉफ्टवेअर वा AI नाही तर एक जीवित नेटवर्क असून एखाद्या छोट्या मुला प्रमाणे स्वत:च्या अनुभवांनी नवीन गोष्टी शिकवते आणि आजच्या सुपर कॉम्प्युटरच्या तुलनेत १० लाख पट कमी वीज खाते.

इराणने बनवला AI चा बाप!

हा साधारण कॉम्प्युटर प्रोग्रॅम नाही तर जीवंत मानवी न्यूरॉन्सपासून तयार झालेले असे नेटवर्क आहे, जे स्वत: निर्णय घेऊ शकते आणि मानवी मेंदू सारखे नवीन गोष्टी शिकू शकते. इराणीच्या संशोधकांनी मानवी पेशींचा वापर करुन केलेला हा छोटा मानवी मेंदू आता जगाला भारी पडणार आहे. इराणने या ऑर्गेनॉईड इंटेलिजन्सच्या जागतिक शर्यतीत प्रवेश करत अमेरिका आणि पश्चिम देशांना थेट आव्हान मिळाले आहे. ज्यामुळे आता संपूर्ण जगाचा पॉवर बॅलन्स बदलू शकतो.

हा जिवंत मेंदूचा खेळ काय आहे?

इराणने केवळ चेतापेशींना जिवंत ठेवण्याचेच नव्हे तर शरीराबाहेर त्यांची वाढ करण्याचे तंत्रज्ञान स्वतंत्रपणे विकसित केले असल्याचे धक्कादायक विधान इराणच्या ब्रेन रिसर्च आणि टेक्नॉलॉजी टीमचे प्रमुखआत्ताउल्लाह पोर-अब्बासी यांनी एका मुलाखतीत केले आहे. या जीवंत पेशी प्रयोगशाळेत एकमेकांशी जोडल्या जात आहेत आणि एक नेटवर्क तयार करीत आहेत, अगदी आपल्या डोक्यातील खऱ्या मेंदूप्रमाणेच ते कार्य करत आहेत. सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे या नेटवर्कमध्ये स्वतःहून शिकण्याची आश्चर्यकारक क्षमता आहे. याचा अर्थ असा की, हा मेंदू कोणत्याही मानवी संकेतांशिवाय, स्वतःच्या अनुभवातून शिकत आहे.

Follow Us
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू