
प्रत्यक्ष युद्ध थांबल्यानंतर इराण आणि अमेरिकेमध्ये आता शाब्दीक युद्धाचा पारा चढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निक नेमवरुन इराणने अमेरिकेवर निशाणा साधलाय. डोनाल्ड ट्रम्प यांना हे निकनेम दुसऱ्यांनी दिलय. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची यांनी इस्रायलवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘इराणी मिसाइल्सपासून वाचण्यासाठी इस्रायल डॅडींकडे पळाला’. हे डॅडी दुसरे तिसरे कोणी नसून स्वत: डोनाल्ड ट्रम्प आहेत. अलीकडेच नाटो परिषदेत त्यांना याच नावाने बोलवण्यात आलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी संतापाच्या भरात लाइव्ह टीव्हीवर इस्रायल आणि इराणबद्दल अपशब्द वापरले होते. त्यावर आता इराण टीका करतोय. “अमेरिकेच्या भाषेत सुधारणा झाली नाही, तर इराण आपली ताकद दाखवण्यापासून मागे हटणार नाही” असं अराकची म्हणाले.
“अमेरिका अणू ऊर्जा डीलबाबत वास्तवात गंभीर असेल, तर त्यांना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्याबद्दल सन्मानजनक भाषा वापरावी लागेल. त्यांच्या कोट्यवधी समर्थकांच्या भावाना दुखावणं हे डीलची शक्यता संपवण्यासारखं आहे” असं अराकची म्हणाले. ‘खामेनेई यांना सोडून दिलं, त्यांना मारलं नाही’ असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटलं. त्यावर इराणने ही प्रतिक्रिया दिली आहे.
इराणला आक्रमकता महागात पडली
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, ते इराणवरुन काही प्रतिबंध हटवण्याचा विचार करत होते. पण इराणच्या प्रतिक्रियेनंतर त्यांनी सर्व प्रयत्न बंद केले आहेत. दुसऱ्याबाजूला इराणने हे दावे फेटाळून लावले. अमेरिकेसोबत पुन्हा कुठलीही चर्चा सुरु होणार नाही हे स्पष्ट केलं.
त्यावेळी इराण अजून बॅकफूटवर
वास्तवात या 12 दिवसाच्या युद्धात इराणने भरपूर मार खालेला आहे. इस्रायलच्या बाजूला नुकसान दिसत असलं, तरी तिथे फक्त इमारती पडल्या. मानवी जीवांच मोठं नुकसान झालं नाही. तेच इराणमध्ये 600 पेक्षा जास्त लोक मारले गेले. महत्त्वाच म्हणजे इस्रायलने इराणच्या नागरीवस्त्यांना लक्ष्य केलं नाही. अमेरिका या युद्धात उतरल्यानंतर इराण अजून बॅकफुटवर गेला.
म्हणून इराणने धमकीची भाषा वापरु नये
अमेरिकेने इराणमध्ये घुसून त्यांच्या तीन अणू प्रकल्पांवर हजारो किलोचे बॉम्ब टाकले. इराणने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या कतारमधील अल उदीद एअरबेसवर हल्ला केला. पण इराणची बहुतांश मिसाइल्स हवेतच नष्ट केली. त्यामुळे इराणने कितीही धमकीची भाषा केली, तर अमेरिका-इस्रायलसमोर त्यांची ताकद कमीच आहे.