फक्त एक देशच नाही तर… इराणच्या धमकीने उडाली जगाची झोप, थेट मोठी खळबळ…

अयातुल्ला अली खामेनी यांनी नुकताच खळबळजनक धमकी दिली. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामध्येच इराणने मोठी धमकी दिली आहे.

फक्त एक देशच नाही तर... इराणच्या धमकीने उडाली जगाची झोप, थेट मोठी खळबळ...
America and Iran
| Updated on: Feb 02, 2026 | 9:37 AM

अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते, असे सातत्याने सांगितले जात आहे. तशी पाऊले देखील अमेरिकेकडून उचलली जात आहेत. इराणकडे अमेरिका पुढे सरकताना दिसत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. खामेनी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, जर इराणवर हल्ला झाला तर त्याचा परिणाम फक्त त्या संबंधित देशालाच नाही तर संपूर्ण प्रदेशाला भोगावा लागेल आणि युद्ध पसरेल. अमेरिकेकडून दबाव असतानाही इराण झुकताना दिसत नाहीये. इराणने पुन्हा एकदा हल्ल्याच्या चर्चांमध्ये थेट धमकी दिल्याचे बघायला मिळाले. अयातुल्ला अली खामेनी सत्ता सोडावी, याकरिता दबाव आहे. अमेरिकेने स्पष्ट शब्दात त्यांना इशारा दिला. इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनालाही पाठबळ देताना अमेरिका दिसली. इराणच्या लोकांचा लढा शेवटच्या टप्प्यात असून कोणत्याही क्षणी त्यांच्यापर्यंत अमेरिकेची मदत पोहोचू शकते, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

अयातुल्ला अली खामेनी यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांना हे माहिती असले पाहिजे की, यावेळी युद्ध केले तर हे युद्ध प्रादेशिक युद्ध असेल आणि याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेत मोठ्या प्रमाणात लष्करी तैनाती केली आहे. यासोबतच त्यांनी अनेकदा थेट इराणवर हल्ला करण्याची धमकी देखील दिली आहे.

खामेनी यांनी यादरम्यान अमेरिकेवर आरोप करत म्हटले की, अमेरिका इराणचे तेल आणि नैसर्गिक वायू संसाधने हाडप करण्याच्या तयारीत आहे, त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणचे तेल आणि नैसर्गिक वायू संसाधने हवी आहेत.  सरकारविरोधी निदर्शनांचे वर्णन परकीय षड्यंत्र म्हणून केले, त्यांनी यापूर्वीच केले आहे.

मुळात म्हणजे खामेनी यांनी केलेल्या विधानानंतर डोनाल्ड ट्रम्प नक्की काय बोलतात? याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र, यावर भाष्य करणे डोनाल्ड ट्रम्प यांनी टाळल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सतत इराणला धमकावले जात आहे. मात्र, ज्यापद्धतीने डोनाल्ड ट्रम्प धमक्या देत आहेत, त्याच पद्धतीने इराणही धमावताना दिसत आहे. मात्र, अमेरिका इराणवर कधीही हल्ला करू शकते, असे सातत्याने सांगितले जात आहे.

Follow Us