जगासाठी गुडन्यूज, इराण होर्मुज खाडी खुली करण्यासाठी तयार, थेट प्रस्ताव, भारतात..
इराण आणि अमेरिका युद्धात जग वैतागले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवण्याची मागणी होत आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने तणाव अधिक वाढला. त्यामध्येच आता या युद्धात एक आनंदाची बातमी पुढे येताना दिसत आहे. ज्यामुळे तणाव कमी होण्याची शक्यता आहे.

इराण आणि अमेरिका युद्धाला जवळपास दोन महिने होत आहेत. सध्या त्यांनी युद्धसंधीची घोषणा केली. मात्र, तणाव काही कमी होत नाही. इराण आणि अमेरिका यांच्यापेक्षाही या युद्धात इतर देशांना मोठा फटका बसत आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जग वैतागले आहे. ऊर्जेचा मोठा तुटवडा निर्माण झाला. त्यामध्येच युद्धविराम चर्चेची दुसरी बैठक रद्द करण्यात आली. अमेरिकेकडून ज्याप्रकारे धमकावले जात आहे, यादरम्यान अमेरिकेसोबत बसून चर्चा शक्य नसल्याचे इराणने म्हटले. इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी चर्चा केली. पण अमेरिकेसोबत थेट चर्चेला नकार दिला. आता इराण आणि अमेरिका युद्धात मोठी बातमी पुढे येत आहे. थोडक्यात काय तर जगाला दिलासा देणारी ही बातमी आहे. इराणने अमेरिकेला नवा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावामध्ये सर्वात खास बाब म्हणजे अमेरिकेने होर्मुज खाडी खुली करण्याबाबत भाष्य केले.
पुन्हा होर्मुज खाडी खुली आणि सुरक्षित करण्याकरिता इराण तयार आहे. मात्र, त्यांनी परमाणूच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा करण्याची अट ठेवलीये. इराणने हा प्रस्ताव अमेरिकेपुढे पाकिस्तानच्या माध्यमातून ठेवला आहे. इराणची इच्छा आहे की, होर्मुज खाडी खुली व्हावी आणि त्यानंतर अमेरिकेने नाकेंबदी हटवावी. मात्र, परमाणूच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची अट इराणकडून ठेवण्यात आली.
पहिल्या टप्प्यात समुद्री संकट दूर करावे, ही इराणची इच्छा आहे. यासोबतच नवीन प्रस्तावात युद्धसंधी वाढवावी किंवा युद्धविराम व्हावा, याबाबतही मुद्दा ठेवण्यात आला. गेल्या प्रस्तावाच्या तुलनेत हा प्रस्ताव अधिक चांगला असल्याचे सांगितले जात आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात आता सर्वात मोठा मुद्दा इराणचे परमाणू बनला आहे. इराणने कोणत्याही प्रकारचा परमाणू ठेऊ नये, अशी अट अमेरिकेची आहे.
पण त्याकरिता इराण राजी नाहीये. मात्र, आता इराण त्यावरही चर्चा करून तोडगा काढण्यास तयार असल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे इराण जैरीस आले. इराणच्या बंदरातून एकही जहाज बाहेर पडू शकत नाही. त्यामध्येच इराणने नवीन प्रस्ताव देऊन अमेरिकेचे टेन्शन वाढवल्याचे बघायला मिळत आहे. आता यावर अमेरिका काय निर्णय घेते, याकडे जगाच्या नजरा आहेत.