AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा पाकिस्तानला मोठा दणका, मध्यस्थी करणे आले अंगलट, लुडबुड थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात तणाव आहे. या युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. मात्र, पाकिस्तानला यश मिळत नाही. त्यामध्येच पाकिस्तानच्या भूमिकेवर आता थेटपणे संशय व्यक्त केला जात आहे. इराणकडून पाकिस्तानला मोठा दणका देण्यात आला.

इराणचा पाकिस्तानला मोठा दणका, मध्यस्थी करणे आले अंगलट, लुडबुड थेट..
Iran and Pakista
| Updated on: Apr 27, 2026 | 8:05 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. मात्र, आता पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. इराणकडून थेट पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली. इराण आणि अमेरिका युद्धाची पहिली बैठक पाकिस्तानमध्ये झाली. काही तास ही बैठक सुरू होती. मात्र, बैठकीतून कोणताही तोडगा निघू शकला नाही. उलट या बैठकीनंतर स्थिती अधिक चिघळली. इराण आणि अमेरिकेत युद्धसंधी लागू करण्यात आली. दुसऱ्याही बैठकीचे आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आले. मात्र, ज्या पद्धतीने धमकावले जात आहे आणि सतत होर्मुज खाडीत दबाव आणला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर इराणकडून थेट एकाच टेबलवर बसून अमेरिकेसोबत चर्चा करण्यास नकार देण्यात आला. तणाव अधिक वाढत आहे. इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानच्या दाैऱ्यावर पोहोचले होते. यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली. मात्र, अमेरिकेसोबत चर्चा करण्यास त्यांनी नकार दिला.

पाकिस्तानच्या मध्यस्थीला इस्त्रायलचा सुरूवातीपासूनच विरोध होता. एक दहशतवादी देश दोन देशांमध्ये युद्धविराम कसे करू शकतो, असा थेट प्रश्नच इस्त्रायलने उपस्थित केला होता. इराणचे खासदार इब्राहिम रझाई यांनी प्रादेशिक चर्चेत मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त केली. इराणकडून सतत पाकिस्तानच्या मध्यस्थीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत.

इब्राहिम रझाई यांनी स्पष्टपणे म्हटले की, पाकिस्तान एक चांगला शेजारी असेल पण अमेरिकेसोबत त्यांचे असलेले संबंध बघता आम्हाला त्यांची निष्पक्षता संशयास्पद वाटत आहे. यासोबतची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. पाकिस्तानवर आम्ही विश्वास ठेऊ शकत नसल्याचे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. पाकिस्तानकडून मध्यस्थीपेक्षा जास्त दिखावेगिरी केली जात आहे.

जर यदा कदाचित पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराण आणि अमेरिका युद्ध थांबले तर पाकिस्तान दोन्ही देशांकडे मदत मागण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकड आहे. युएईने पाकिस्तानला अगोदरच झटका दिला. स्वत:च्या देशात दिवाळे निघालेले असताना पाकिस्तान दोन देशांमध्ये मध्यस्थी करण्यास निघाला आहे. दोन ते तीन आठवड्यात पाकिस्तानला मध्यस्थी करण्यात यश मिळाले नाही तर दुसरा देश या युद्धात मध्यस्थी करू शकतो.

Follow Us
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!
डोळ्यात पाणी अन्... tv9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भावूक
डोळ्यात पाणी अन्... tv9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भावूक
चार्टर्ड विमानातून दिल्ली दौरा, चाललंय तरी काय? अंजली दमानिया मैदानात
Anjali Damania | चार्टर्ड विमानातून दिल्ली दौरा, चाललंय तरी काय? आता अंजली दमानिया मैदानात, मागितला हिशोब!
ठाकरे गट डेमेज कंट्रोलच्या तयारीत; संजय राऊत लोकसभा अध्यक्षांच्या भेटी
ठाकरे गट डेमेज कंट्रोलच्या तयारीत; संजय राऊत लोकसभा अध्यक्षांच्या भेटीत नेमकं काय घडलं?
जशास तसे! मविआ'त मोठी घडामोड, थेट निर्णय... लेकाला विधान परिषदेत जागा
जशास तसे! मविआ'त मोठी घडामोड, थेट निर्णय...  लेकाला विधान परिषदेत जागा देऊनही ठाकरेंच्या खासदाराची बंडखोरी
जनतेच्या पाठीत खंजीर खुपसू नका! आष्टीकरांविरोधात ग्रामस्थांचा संताप
जनतेच्या पाठीत खंजीर खुपसू नका! नागेश आष्टीकरांविरोधात ग्रामस्थांचा संताप, गद्दारी केल्यास परिणाम भोगावे लागतील
सर्वात मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर पुण्यात की दिल्लीत? स्वत: फोनवर
सर्वात मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर पुण्यात की दिल्लीत? स्वत: फोनवर दिलेल्या उत्तराने खळबळ
घरात घुसून जाब विचारा!; 6 MPच्या बंडाच्या चर्चांवर अंधारेंचा संताप
Sushma Andhare | घरात घुसून जाब विचारा!; 6 MPच्या बंडाच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचा संताप, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ