इराण अमेरिकेच्या सैन्याच्या स्वागताच्या तयारीत, ती चूक अमेरिकेसाठी ठरू शकते भयानक, स्फोटांना..

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा फटका जगातील सर्व देशांना बसत आहे. या युद्धामुळे मोठा हाहाकार उडाला. यादरम्यानच आता अत्यंत धक्कादायक अशी माहिती पुढे येत आहे. या माहितीने थेट मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.

इराण अमेरिकेच्या सैन्याच्या स्वागताच्या तयारीत, ती चूक अमेरिकेसाठी ठरू शकते भयानक, स्फोटांना..
Kharg Island
| Updated on: Mar 26, 2026 | 10:08 AM

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष काही कमी होण्याचे नाव घेत नाही. इराणकडून पूर्णपणे होर्मुज खाडी बंद करण्याची धमकी देण्यात आल्यानंतर 5 दिवसांकरिता अमेरिकेकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. युद्ध थांबवण्याच्या मुद्द्यावर बोलताना इराणकडून स्पष्ट सांगण्यात आले की, आमच्या 6 अटी मान्य केल्या तरच हे युद्ध थांबू शकते. त्यामध्ये इराणकडून इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या नुकसानाची भरपाईही मागितली आहे. अन्य काही महत्वाच्या अटी आहे. होर्मुज खाडीमुळे चारही बाजूंनी झालेल्या टीकेनंतर अमेरिकेने एक पाऊल युद्धात माघार नक्कीच घेतली पण अमेरिकेच्या डोक्यात नक्की मोठा कट असल्याचे सांगितले जातंय. इराणचे खारग बेट या संघर्षाचे केंद्र बनले आहे. हे छोटे बेट इराणसाठी खूप जास्त महत्वाचे असून आर्थिक जीवनरेखा आहे. विशेष बाब म्हणजे इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी 90 टक्के वाटा येथून येतो. आता इराणला मोठी चिंता सतावत आहे.

इराणच्या मनात कुठे ना कुठे भीती आहे की, अमेरिका त्यांच्या सैन्याला याच बेटावर उतरवेल. यामुळे अमेरिकेला फसवण्याकरिता इराणकडून मोठे जाळे टाकण्यात आले. इराण देखील अमेरिकेच्या सैन्याच्या स्वागतासाठी तयारच बसला आहे. नुकताच आलेल्या सीएनएनच्या एका अहवालानुसार, इराणने गेल्या काही आठवड्यांत अतिरिक्त सैन्य या बेटावर तैनात केले.

यासोबतच हवाई संरक्षण यंत्रणाही त्यांच्याकडून याठिकाणी अत्यंत मजबूत करण्यात आली. या बेटाला त्यांनी लष्करी किल्ल्यासारखे स्वरूप दिले आहे. क्षेपणास्त्र प्रणालींही तिथे आहे. कोणत्याही परिस्थितीत अमेरिका या बेटावर काहीच करू शकणार नाही, याची पूर्ण काळजी इराणकडून घेतली जात आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इराणने बेटाभोवती भूसुरुंगांचे जाळे पसरवले आहे. अँटी-पर्सनल माईन्स आणि रणगाडे व  उडवण्यासाठी असलेले अँटी-आर्मर माईन्स विशेषतः किनारपट्टीच्या भागांमध्ये पेरण्यात आले आहेत. अमेरिकेच्या सैन्याने या बेटावर उतरण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना महाग पडू शकते. जर अमेरिकेने जमिनीवरून कारवाई केली, तर सैनिक थेट मृत्यूच्या सापळ्यात अडकू शकतात. इराणने पूर्णपणे कंबर कसल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us