AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग होर्मुज खाडी करत बसले, तिकडे चीनकडून खेळण्यात आल्या मोठा खेळ, शांतपणे चीनने थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठी खळबळ उडाली. सर्व जग होर्मुज खाडी बंद असल्याने तणावात आले. मात्र, आता या दरम्यान अत्यंत खळबळ उडवणारी माहिती पुढे येताना दिसत आहे.

जग होर्मुज खाडी करत बसले, तिकडे चीनकडून खेळण्यात आल्या मोठा खेळ, शांतपणे चीनने थेट..
Xi Jinping
| Updated on: Mar 26, 2026 | 8:53 AM
Share

अमेरिका आणि इस्त्रायलकडून अत्यंत मोठा हल्ला इराणवर करण्यात आला. त्यानंतर जग तणावात आले. इराणकडून थेट महत्वाची होर्मुज खाडी बंद करण्यात आली. ही खाडी बंद असल्याने तेलाची निर्यात आणि आयात जवळपास ठप्प झाली. होर्मुज खाडीत जगभरातील तेलवाहू जहाज अडकून पडली. काही देशांमध्ये तर आणीबाणी लावण्याची वेळ आली. भारत, चीन, बांगलादेश, पाकिस्तान या देशांमध्ये तेल येणे कठीण झाले. भारताचे काही जहाज इराणकडून सोडण्यात आल्याने भारताला मोठा दिलासा मिळाला. सर्व जग होर्मुज खाडी होर्मुज खाडी करत बसलेले असताना दुसरीकडे चीनने मोठा डाव केल्याचे बघायला मिळतंय. चीनने होर्मुज खाडीच्या संकटातून गुपचूप मार्ग काढला. यासोबतच याची भनक त्यांनी कोणालाही लागू दिली नाही. जागतिक बाजारात या युद्धामुळे तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या. ज्यावेळी जग होर्मुज खाडी खुली करण्याकरिता प्रयत्न करत होते, त्यावेळी चीनकडून वेगळ्या पर्यायाचा शोध घेतला जात होता.

चीनच्या ऊर्जा संक्रमणाला दोन मोठ्या सरकारी कंपन्या चालना देत आहेत. स्टेट ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ चायना आणि चायना सदर्न पॉवर ग्रिड. त्या आधीच एक अब्जाहून अधिक लोकांना वीजपुरवठा करत आहेत आणि देशाच्या बहुतांश भागात त्यांचीच वीज आहे. आता, त्या आपली ही व्याप्ती आणखी धोरणात्मक स्तरावर विस्तारत आहेत.

दूरवरच्या अंतरावर कार्यक्षमतेने वीज प्रसारित करू शकणारे देशव्यापी अति-उच्च-व्होल्टेज पारेषण जाळे उभारणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे चीनला आयात केलेल्या तेल आणि वायूवर कमी आणि देशांतर्गत निर्माण होणाऱ्या विजेवर अधिक अवलंबून राहता येईल. ज्यावेळी होर्मुज खाडी बंद होती, त्यावेळी चीनकडून यावर काम केले जात होते.

चीनचे सुपरग्रीड हा फक्त एक पायाभूत सुविधा प्रकल्प नाही. चीनच्या ऊर्जा सुरक्षेला नव्याने आकार देण्यासाठी उचललेले हे एक धोरणात्मक पाऊल आहे. त्यामुळे बाहेरील ऊर्जांवर चीनला फार काही अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. अमेरिकेने या युद्धात थेट चीनला ओढण्याचा प्रयत्न केला पण चीनने या युद्धापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?