tv9 Marathi Special Report | हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भावनिक पत्र…
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याला तब्बल सव्वा टन कांदा विकून उलट एक रुपया भरावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याची अशीच दयनीय परिस्थिती असल्याचे चित्र आहे.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याला तब्बल सव्वा टन कांदा विकून उलट एक रुपया भरावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याची अशीच दयनीय परिस्थिती असल्याचे चित्र आहे. पाच महिने मेहनत करून आणि हजारो रुपये खर्च करून पिकवलेला कांदा विक्रीसाठी बाजारात आणल्यानंतरही शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. उलट वाहतूक, हमाली आणि इतर खर्च वजा गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात काहीच रक्कम राहत नसल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर एका संतप्त शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून न्याय देण्याची मागणी केली आहे. “हा घ्या एक कांदा आणि एक रुपया… आता तरी शेतकऱ्यांचा आक्रोश ऐका,” अशा शब्दांत शेतकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पैठण तालुक्यातील या घटनेनंतर बीड, लासलगाव, नाशिक, सटाणा, धुळे, येवला आणि बागलाणसह अनेक कांदा बाजारपेठांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे समोर येत आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला माल बाजार समित्यांमध्ये विकूनही हातात खाण्यापुरते पैसे राहत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
राज्यातील कांदा उत्पादकांच्या या गंभीर परिस्थितीकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...

