AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 व्या वर्षी 18 वर्ष मोठ्या मुस्लिम पुरुषाशी लग्न… मुलीच्या जन्मानंतर घटस्फोट आणि… आता कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी खासगी आयुष्यात अनेक दुःख पाहिली आहे. एका अभिनेत्रीने तर कुटुंबियांच्या विरोधात जात मुस्लिम पुरुषाशी लग्न... पण मुलींच्या जन्मानंतर झाला घटस्फोट... आता कसं आयुष्य जगतेय अभिनेत्री?

20 व्या वर्षी 18 वर्ष मोठ्या मुस्लिम पुरुषाशी लग्न... मुलीच्या जन्मानंतर घटस्फोट आणि... आता कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
| Updated on: May 11, 2026 | 10:19 AM
Share

टीव्ही आणि बॉलिवूड विश्वातील अनेक अभिनेत्री त्यांच्या कामामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चत असतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने स्वतःच आयुष्याचं सत्य सगळ्यांना सांगितलं आहे. सांगायचं झालं तर, अनेक अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार काही सांगत नाहीत, पण अभिनेत्री तनाज इराणीने अलीकडेच तिच्या आयुष्याबद्दल अशा प्रकारे मनमोकळेपणाने सांगितलं की लोक चकित झाले. तनाजने प्रेम, लग्न, घटस्फोट, सामाजिक विरोध आणि तुटलेल्या कुटुंबाचं दुःख अशा प्रत्येक विषयावर मनमोकळेपणाने भाष्य केलं.

तनाज इराणी हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहे. तनाज इराणी हिने वयाच्या 20 व्या वर्षी 18 वर्ष मोठ्या मुस्लिम पुरुषासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तनाज म्हणते, ‘त्याने कधीच माझ्यावर कोणतेच निर्बंध लागले नाहीत… माझ्या नवऱ्याने सर्व प्रकारचे फ्रिडम दिले होते. मात्र, त्यांच्या नात्याला समाजाकडून आणि त्यांच्या स्वतःच्या समुदायाकडून मोठा विरोध झाला. रिपोर्टनुसार, त्यांच्या आंतरधर्मीय विवाहामुळे अभिनेत्रीला स्वतःच्या पारशी समुदायातून बहिष्कृत करण्यात आले.

कमी वयात घटस्फोट…

तनाज हिने सांगितल्यानुसार, लग्नानंतर फार कमी वयात अभिनेत्री आई झाली. अशात वेळेनुसार, त्यांच्या नात्यात आणखी दुरावा वाढत होता आणि या सर्व परिस्थितीचा परिणाम त्यांच्या मुलीवर झाला. अभिनेत्री म्हणाली, ‘घटस्फोटानंतर माझी लेक पूर्णपणे एकटी पडली होती आणि शांत झालेली.’ तनाज हिला आजही पश्चाताप होतो की, ती काही गोष्टी योग्या प्रकारे हाताळू शकली नाही.

नवऱ्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा तुम्ही 20 वर्षांचे असता तेव्हा एक महिला म्हणून तुमचा विकास होत असतो. तो एका चांगला पुरुष होता. मला माझं आयुष्य माझ्यानुसार जगता येत होतं. पण मी कोणत्या दुसऱ्यात गोष्टीच्या शोधात होती. बाहेर जाणं… मज्जा – मस्ती करणं… या सगळ्या गोष्टी मला आवडत होत्या आणि तो माझ्यापेक्षा अधिक समजदार होता. त्यामुळे पूर्ण गोष्टी मी कधी समजूच शकले नाही.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. घटस्फोटानंतर अभिनेत्री दुसरं लग्न बख्तियार इराणी याच्यासोबत केलं. दोघांच्या नात्याला देखील सुरुवातीला कुटुंबियांनी विरोध केला. पण दोघांनी प्रत्येक कठीण प्रसंगी एकमेकांची साथ दिली. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.

घटस्फोटानंतर अभिनेत्रीने तिचं पूर्ण लक्ष करियरकडे केंद्रीत केलं. अभिनय विश्वात तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली… ‘कहो ना प्यार है’, ‘मैं प्रेम की दीवानी हूं’, ’36 चाइना टाउन’ यांसारख्या सिनेमांमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली आणि अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?