AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Rate : सोने स्वस्त, नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर थेट घसरण, जाणून घ्या आजचे भाव..

Gold Silver Price Today Live, 11 May 2026 : पुढील एक वर्ष सोने खरेदी करू नका, असे आवाहन भारतीय नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतर आज सोन्याच्या भावात घसरण झालीये.

Gold-Silver Rate : सोने स्वस्त, नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर थेट घसरण, जाणून घ्या आजचे भाव..
Gold Silver Price Today
| Updated on: May 11, 2026 | 10:02 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये सतत चढउतार बघायला मिळत आहे. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या किमती गगणाला पोहोचल्या होत्या. मात्र, त्यानंतर सोने स्वस्त झाले. यादरम्यान अनेकांनी हीच योग्य वेळ असल्याचे सांगत जोरदार सोन्याची खरेदी केली. सोने त्याच्या उच्चांकापेक्षा आजही 40 ते 50 हजारांनी स्वस्त आहे. मात्र, यादरम्यानच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोने एक वर्षासाठी खरेदी करू नका असे आवाहन केले. यामुळे पुढील काही काळात सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. परकीय चलनाला गती न देण्याकरिता त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. गेल्याच आठवड्यात भारतातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या भावात मोठा चढउतार बघायला मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सोन्याचे आजचे भाव पुढे आले आहेत. आज 11 मे 2026 रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. दिल्ली आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये सोन्याच्या किमती घसरत आहेत. सतत सोन्याच्या किमती घसरताना दिसत आहेत. त्यामध्येच पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीमध्ये किंचित घसरण दिसून आलीये.

आज मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,350 रूपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,650 रूपये आले. जवळपास 200 रूपयांनी सोन्याच्या भावात घसरण नोंदवली गेली. दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,500 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,800 रूपये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सोन्याच्या भावात घसरण नोंदवण्यात आली. भारतीयांना मोठे आवाहन करत पुढच्या एक वर्षापर्यंततरी सोने खरेदी करू नका असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना पेट्रोल आणि डिझेलचा जपून वापर करा. अनावश्यक असेल तर विदेशात जाणे टाळावे, खाद्यतेलाचा वापर कमी करणे परकीय चलन वाचवण्यासाठी जनतेला एकजूट होण्याचे आवाहन केले. त्यामध्येच त्यांनी सोने न खरेदी करण्याचेही आवाहन केले. यामुळे भारतीय सराफा व्यापारावर याचा थेटपणे परिणाम होऊ शकतो.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?