AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Price Today : सोने स्वस्त, ताई, बाई, आक्का आजच खरेदी करा सोने, तब्बल..

Gold-Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सतत घसरण बघायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासूनच सोने आणि चांदीच्या भावात घसरण सुरू आहे. आजही सोन्याच्या भावात मोठे बदल झाले आहेत.

Gold-Silver Price Today : सोने स्वस्त, ताई, बाई, आक्का आजच खरेदी करा सोने, तब्बल..
Gold Silver Price Today
| Updated on: May 10, 2026 | 11:26 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. फक्त सोनेच नाही तर त्याच्यासोबतच चांदीच्याही किमतीमध्ये मोठी घसरण झाली. सोने आणि चांदीच्या किमती सध्याच्या घडीला त्याच्या उच्चांकापेक्षा अर्ध्या आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या किमती गगणाला पोहोचल्या. मात्र, 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर अमेरिका आणि इस्त्रायलने मोठा हल्ला केला. त्या हल्ल्यानंतर किमती सतत घसरताना दिसत आहेत. युद्धविरामानंतर पुन्हा पूर्वीसारख्या किमती वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 24 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या किमती कमी झाल्या आहेत. आज राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,52,500 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,39,800 रुपये नोंदवला गेला आहे. शुक्रवार, 8 मे रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 100 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,55,900 रुपयांवर आला.

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,721 डॉलरवर व्यवहार करत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबले की, पुन्हा सोन्याचे भाव गगणाला पोहोचण्याची शक्यता आहे. 3 महिन्यांपूर्वी सोने आणि चांदीचे जे भाव होते, त्यावरून कोणीही विचार केला नसेल की, इतक्या कमी सोने आणि चांदीचे भाव येतील आणि इतकी जास्त घसरण होईल.

मुंबई येथे आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,350 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,650 रुपये आहे. अहमदाबाद येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,400 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,700 रुपये आहे. हैद्राबाद येथे आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,350 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,650 रुपये आहे. चैन्नई येथे आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,370 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,500 रुपये आहे.

सोने अजूनही त्याच्या उच्चांकापेक्षा जवळपास 50 हजारांनी स्वस्त असल्याचे बघायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजारपेठ अस्थिर झाली. शेअर मार्केटला फटका बसत आहे. आखाती देश या युद्धामुळे संकटात सापडली आहेत. त्यामध्येच सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीमध्ये सतत घसरण बघायला मिळत आहे. याचा भारतीय सराफा बाजारावर परिणाम बघायला मिळत आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?