AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खबरदार तुम्ही जर… इराणची हादरवणारी धमकी, जग तणावात, युद्धात जर

इराण आणि अमेरिका युद्ध लवकरात लवकर थांबण्याची मागणी केली जात आहे. यादरम्यानच अत्यंत मोठी धमकी इराणकडून इस्त्रायल आणि अमेरिकेला दिली. मात्र, या धमकीने जगाचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळत आहे.

खबरदार तुम्ही जर... इराणची हादरवणारी धमकी, जग तणावात, युद्धात जर
Iran
| Updated on: Mar 26, 2026 | 8:20 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. अमेरिकेकडून पाच दिवसांकरिता यु्द्धबंदी जाहीर करण्यात आली. यादरम्यान इजिप्त पुढे आला असून युद्धबंदी करारावर चर्चा सुरू आहे. इराणकडून प्रमुख 6 मागण्या युद्ध बंद करण्यासाठी ठेवण्यात आल्या. यादरम्यान चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, इराणकडून स्पष्ट करण्यात आले की, आमची कोणतीही थेटपणे चर्चा अमेरिकेसोबत सुरू नाही. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही हटणार नाहीत. अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्लात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. त्यानंतर मोजतबा खामेनेई यांच्या नावाची घोषणा इराणचे सर्वाेच्च नेते म्हणून करण्यात आली. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जग मोठ्या संकटात आले आणि एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या निर्माण झाली.

इराणच्या तस्नीम न्यूज एजन्सीने नुकताच दिलेल्या रिपोर्टनुसार, इराणच्या बेटांवर हल्ले झाले तर इराणकडून थेट बाब अल मंडेब खाडी बंद केली जाईल. होर्मुज खाडीनंतर आता इराणकडून आता थेट बाब मंडेल खाडीकडे मोर्चा वळवण्यात आला. इराणकडून देण्यात आलेल्या या धमकीमुळे जगाचे टेन्शन वाढले आहे. कारण हा अत्यंत महत्वाचा समुद्रीमार्ग आहे.

इराणच्या बेटांवर इस्त्रायल आणि अमेरिकेने हल्ला केला तर आता इराण थेट हा महत्वाचा समुद्री मार्ग बंद करण्याच्या तयारीत आहे. फारस खाडीत इराणचे 30 पेक्षा अधिक बेट आहेत. आर्थिक दृष्टीने इराणसाठी ही बेटे महत्वाची आहेत. त्यावर हल्ला केला तर पुढे काही होईल, याची मोठी धमकी इराणकडून देण्यात आली. इराणच्या या धमकीने जगाची झोप उडाली.

इराण आणि अमेरिका युद्ध संपण्याचे संकेत आहेत. यादरम्यानच आता इराणकडून ही नवीन धमकी देण्यात आली. इराण आणि अमेरिका युद्ध लवकर थांबावे, अशी मागणी जगाची आहे. कारण या युद्धामुळे जगातील अनेक देश संकटात आहेत. गॅससोबतच कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. भारतासाठी इराणकडून होर्मुज खाडी सुरू करण्यात आली. भारतासोबतच 4 देशांकरिता इराणने होर्मुज खाडी खुली असल्याची घोषणा केली.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?