AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताबद्दल इराणकडून अत्यंत मोठी घोषणा, थेट आनंदाची बातमी, 5 देशांच्या यादीत…

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मोठा हल्ला इराणवर केला. या युद्धादरम्यान इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद ठेवण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशात गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या निर्माण झाली. यादरम्यानच आता भारताकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली.

भारताबद्दल इराणकडून अत्यंत मोठी घोषणा, थेट आनंदाची बातमी, 5 देशांच्या यादीत...
Iranian Foreign Minister Abbas Araghchi
| Updated on: Mar 26, 2026 | 7:50 AM
Share

मध्य पूर्वेत मोठा तणाव बघायला मिळत आहे. 28 फेब्रुवारी 2026 पासून युद्धाला सुरूवात झाली. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडीत जहाजांचे मोठे जाम लागले. भारतासह अन्य देशांचे जहाज अडकून पडले. होर्मुज खाडीत भारताचे 20 जहाज अडकले. भारत सरकारने चर्चा केल्यानंतर भारताच्या काही जहाजांना सुरक्षित रस्ता देण्यात आला. भारतात होर्मुज मार्गेच कच्चे तेल आणि एलपीजी गॅस पोहोचतो. हाच मार्ग बंद असल्याने भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यादरम्यानच आता भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नुकताच इराणकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. इराणकडून सुरूवातीपासूनच सांगितले जात आहे की, होर्मुज खाडी पूर्णपणे बंद नाहीये.

ज्यावेळी अमेरिकेने ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली. त्यावेळी इराणकडून थेट पूर्णपणे होर्मुज खाडी बंद करण्याची धमकी दिली आणि थेट अमेरिकेने पाच दिवसांकरिता युद्धबंदी जाहीर केली. इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले की, आम्ही आमच्या जवळच्या मित्र पाच देशांकरिता होर्मुज खाडी खुली केली आहे आणि होर्मुज खाडी पूर्णपणे बंद नाहीये.

आम्ही मित्र पाच देशांना होर्मुज खाडीतून सुरक्षित रस्ता देत आहोत. अराघची यांनी म्हटले की, भारत, रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तान या देशांना आम्ही होर्मुज खाडी वापरण्याची परवानगी दिली आहे आणि त्या देशाचे जहाज सुरक्षित होर्मुज खाडीतून प्रवास करत आहेत. होर्मुज खाडी फक्त अशा देशांकरिता बंद आहे, जे आमचे शत्रू देश आहेत आणि शत्रू देशांना मदत करणाऱ्या देशांकरिताही होर्मुज खाडी बंद आहे.

बऱ्याच देशांनी आम्हाला संपर्क केला आणि त्यांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची विनंती केली. आम्ही ज्यांना मित्र मानतो अशा देशांना आम्ही होर्मुज खाडीतून सुरक्षित रस्ता देत आहोत. हेच नाही तर अब्बास अराघची यांनी हे देखील स्पष्ट केले की, अमेरिकेसोबत त्यांची कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?