AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींचं देशवासियांना एक आवाहन, सकाळ होताच शेअर बाजारात महाभूकंप… धाडधाड मार्केट कोसळलं; थेट..

Stock Market Crash : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मोठे आवाहन केले. यासोबतच इराणकडून अमेरिकेला युद्धविरामाचा प्रस्ताव देण्यात आला, तो प्रस्ताव अमेरिकेने नाकारला. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. यासर्व गोष्टींचा परिणाम शेअर बाजारावर झाला.

मोदींचं देशवासियांना एक आवाहन, सकाळ होताच शेअर बाजारात महाभूकंप... धाडधाड मार्केट कोसळलं; थेट..
Indian Stock Market Crash
| Updated on: May 11, 2026 | 10:39 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या भाषणात भारतीयांना काही मोठी आवाहने केली. त्याचा परिणाम आज शेअर बाजारात बघायला मिळाला. 11 मे रोजी शेअर बाजार उघडताच निफ्टी 250 अंकांनी घसरला. सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांनी घसरून थेट 76,450 वर बंद झाला. सर्वच कंपन्यांच्या शेअरवर मोठा परिणाम झालाय. आज निफ्टीमधील सर्वाधिक घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये इंडिगो, टायटन, एसबीआय यांचा समावेश आहे. या सर्व शेअर्समध्ये 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. टाटा कन्झ्युमर्सच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना संबोधित करताना महत्वाच्या कामांशिवाय विदेश यात्रा करणे टाळा, असेही आवाहन केले. यासोबतच पुढील 1 वर्षांकरिता सोने खरेदी टाळण्याचेही आवाहन केले. ज्याचा थेट परिणाम सराफा बाजारात दिसू शकतो.

शेअर बाजारातील घसरणीचे कारण म्हणजे इराण आणि अमेरिका युद्ध आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून देण्यात आलेले शांतता चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे. ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती जवळपास 3.5 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 105 डॉलवर पोहोचल्या आहेत. ज्याचा परिणाम शेअर बाजारात दिसत आहे.

कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे जागतिक बाजारपेठेत मोठे संकट आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही बघायला मिळतोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबणे महत्वाचे आहे. काही दिवसात युद्धविराम झाला नाही तर परिस्थिती अजून भयंकर होऊ शकते. सध्याच्या घडीला कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्याचे बघायला मिळत आहे.

गोल्ड आणि इतर ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे सकाळच्या सत्रात रुपया 40 पैशांनी घसरला. गेल्या दोन महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामध्येच आता पुन्हा वाढ झाली. काही विमान कंपन्यांच्या शेअरमध्येही घसरण झाली. नरेंद्र मोदी यांनी विदेश यात्रा टाळण्याचेही आवाहन केले.

Follow Us
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?