इराणकडून भारताबद्दल थेट अत्यंत मोठी घोषणा, जगाने रोखला श्वास, आता भारतीय…
इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. अमेरिकेकडून होर्मुज खाडी खुली करण्याकरिता वेळ दिला. मात्र, तरीही इराण होर्मुजमधून मागे हटताना दिसत नाही. काही तासात परिस्थिती अधिक घातक होऊ शकते. यादरम्यानच इराणमधून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी पुढे येत आहे.

निश्चितपणे इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. युद्धाला एक महिना पूर्ण होऊन गेला. युद्धाचा फटका जगाला बसत आहे. जागतिक बाजार अस्थिर झाला. गेल्या 48 तासापासून युद्ध थांबवण्याकरिता मोठ्या घडामोडी घडत आहेत. मध्यस्थी करणाऱ्या देशांनी अमेरिका आणि इराणला मोठा प्रस्ताव युद्धबंदी कराराकरिता दिला. मात्र, या प्रस्तावाला इराणकडून केराची टोपली दाखवण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुज खाडी खुली करण्यासाठी 48 तासाचा वेळ दिला. जर उद्यापर्यंत इराणकडून अमेरिकेच्या प्रस्ताव स्विकारण्यात आला नाही तर अमेरिका विनाशाला सुरूवात करेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याची तारीख आणि थेट वेळही सांगून टाकली. होर्मुज खाडी बंद असल्याने जगातील अनेक देश संकटात आहेत. त्यापैकी एक भारत आहे. यादरम्यानच इराणमधून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी पुढे येताना दिसत आहे.
इराण भारतासह इतर मित्र देशांना सुरक्षित रस्ता होर्मुज खाडीतून देणार आहे. यापूर्वीही इराणकडून भारतीय जहाजांना सुरक्षित रस्ता देण्यात आला. भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहली यांनी एएनआयला बोलताना म्हटले की, इराणकडून होर्मुज खाडी अशा देशांकरिता बंद करण्यात आली. जी युद्धात सहभागी आहेत. इराणने कायमच होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेवर भर दिला.
होर्मुज खाडी आंतराष्ट्रीय जलमार्गाचा हिस्सा नाहीये. ती इराण आणि ओमानचा क्षेत्रीय हिस्सा आहे. यामुळे आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही पाऊल उचलू शकतो. सध्या मध्य पूर्वेतील तणावात भारत महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. भारताच्या संयमाचेही त्यांनी काैतुक केले. या युद्धात भारताची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आमचे स्पष्ट म्हणणे आहे की, भारतासारख्या देशांच्या भूमिका या युद्धात महत्वाच्या ठरू शकतात.
अमेरिका आणि इस्त्रायलच्या सैन्याकडून ज्याप्रकारे हल्ले केले जात आहेत, त्यावर टीकाही त्यांनी केली. भारताने या युद्धात कायमच संयमाची भूमिका घेतली. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवण्याकरिता भारताकडून प्रयत्न केली जात आहेत. भारताचे अनेक जहाज होर्मुज खाडीत अडकली आहेत. यातून मार्ग काढण्याकरिता प्रयत्न केला जात आहे. त्यामध्येच आता इराणकडून भारतासाठी आनंदाची बातमी आली.