AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 13 रुपयांनी वाढ, सरकारच्या घोषणेने खळबळ; नागरिकांचे बजेट कोलमडले

Petrol Price Increased : भारतासह शेजारील देशांमधील नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. आता पुन्हा एकदा पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 13 रुपयांनी वाढ, सरकारच्या घोषणेने खळबळ; नागरिकांचे बजेट कोलमडले
Pakistan Petrol PriceImage Credit source: Google
| Updated on: Jul 11, 2026 | 5:46 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगातील इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक देशांमधील इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे. भारतासह शेजारील देशांमधील नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. आता पुन्हा एकदा पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या दरात 13.18 पाकिस्तानी रुपये, तर हाय-स्पीड डिझेलच्या दरात 13.80 पाकिस्तानी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

इंधनाच्या किंमतीत झालेल्या या दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर 310.71 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर, तर हाय-स्पीड डिझेलचा दर 323.30 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर झाला आहे. पेट्रोलियम विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नवीन दर आजपासूनच लागू झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील नागरिकांवर महागाईचा आणखी मोठा बोजा पडणार आहे.

काही दिवसांपूर्वीच झाली होती मोठी कपात

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठी कपात करण्यात आली होती. 28 फेब्रुवारी रोजी डिझेलचा दर 281 रुपये प्रति लिटर होता, तर 3 एप्रिल रोजी तो 530.35 रुपये प्रति लिटर या उच्चांकावर पोहोचला होता. त्याचप्रमाणे 3 एप्रिल रोजी पेट्रोलचा दर 458.41 रुपये प्रति लिटर होता, तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात तो 266 रुपये प्रति लिटर होता. त्यानंतर उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या दरांमध्ये मोठी घट करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा एकदा नागरिकांना दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

भारतात पेट्रोल-डिझेल किती वेळा महागले?

मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतावरही झाला आहे. मे 2026 मध्ये चार वेगवेगळ्या टप्प्यांत पेट्रोलच्या किमतीत एकूण 7.80 रुपये प्रति लिटर, तर डिझेलच्या किमतीत 8.70 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 95.20 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर इतर राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 110 ते 115 रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला