होर्मुज खाडी खुली होणार… अमेरिकेला या 3 अटी मान्य कराव्या लागतील, जगाला मोठी आशा..

इराण आणि अमेरिका युद्ध एका वेगळ्या स्थितीत येऊन पोहोचले आहे. दोन्ही देश मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामध्येच इराणकडून अमेरिकेला होर्मुज खाडी खुली करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला. अमेरिकेचा दबाव असतानाही इराण मागे हटताना दिसत नाहीये.

होर्मुज खाडी खुली होणार... अमेरिकेला या 3 अटी मान्य कराव्या लागतील, जगाला मोठी आशा..
US Iran
| Updated on: Apr 28, 2026 | 8:12 AM

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे कारवाई करत मोठा हल्ला इराणवर केला. त्यानंतर ज्या ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेचे लष्करतळ आहेत, अशा ठिकाणी मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. जिकडे वाटेल तिकडे हल्ले झाली. या युद्धात इराणने अमेरिकेसह इस्त्रायलला सळो की पळो करून सोडले. इतक्या घातकपणे इराण हल्ल्यांना उत्तर देईल, याचा विचारही अमेरिकेने केला नव्हता. पहिल्या हल्ल्यातच अमेरिकेने इराणच्या सर्वाेच्च नेत्याची हत्या केली. त्यामुळे कोणालाही वाटले नव्हते की, इतके दिवस युद्ध सुरू राहिल. मात्र, इराणने हार मानली नाही. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धसंधीची घोषणा करण्यात आली. मात्र, तरीही इराण मागे हटताना दिसत नाहीये. होर्मुज खाडीजवळ अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीनंतर इराणने अमेरिकेसोबत चर्चा करण्यासही नकार दिला.

डोनाल्ड ट्रम्प इराणला मोठ्या धमक्या देत असतानाही इराण मागे हटत नाही. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता इराणकडून तीन मोठ्या अटी ठेवण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने अमेरिकेला म्हटले आहे की, होर्मुज खाडी जर पूर्णपणे खुली हवी असेल तर पहिली अट म्हणजे तुम्हाला नाकेबंदी काढावी लागेल. इराणच्या जहाजांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र रस्ता द्यावा लागेल.

दुसरी अट इराणच्या बंदरांभोवती केलेली नाकेबंदी काढावी लागेल. तिसरी अट परमाणूच्या विषयावरील चर्चा सध्या टाळली पाहिजे. जर अमेरिकेने इराणच्या या तीन प्रमुख अटी मान्य केल्या तर होर्मुज खाडी पूर्णपणे इराण खुली करण्यास तयार आहे. अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जग तणावात आहेत.

तेलाच्या किमती वाढत आहेत. अनेक देशांमध्ये एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प इराणच्या या तिन्ही अटी मान्य करण्यास तयार नाहीत. इस्लामाबाद येथे झालेल्या युद्धकरार बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही, त्यानंतर अमेरिकेने इराणभोवती मोठी नाकेबंदी केली. या नाकेबंदीमुळे इराणच्या बंदरातून एकही जहाज निघू शकत नाही.

ज्याचा थेट फटका इराणवर होत आहे. इराणला तेलाची निर्यात करणेही शक्य होत नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचे मोठे संकट आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन दिवसात इराणने काही केले नाही तर त्यांच्या तेलाच्या पाईपलाईन फुटतील असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि इराणकडून देण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us