Iran Israel War: युद्धादरम्यान PM मोदींचा मोठा निर्णय, इराणच्या राष्ट्रपतींना केला फोन, आता युद्ध थांबणार?

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आणखी पेटले आहे. अशातच आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवर चर्चा केली.

Iran Israel War: युद्धादरम्यान PM मोदींचा मोठा निर्णय, इराणच्या राष्ट्रपतींना केला फोन, आता युद्ध थांबणार?
pm modi and iran president
| Updated on: Jun 22, 2025 | 4:11 PM

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आणखी पेटले आहे. आता या युद्धात अमेरिकेने एन्ट्री केली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला करून ती नष्ट केल्याचा दावा केला आहे. यानंतर इराणने अमेरिकेला बदला घेणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवर चर्चा केली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते सविस्तर जाणून घेऊयात.

पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना फोन

इस्रायल आणि इराणमधील संघर्षादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांना फोन केला. पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली. मोदींनी ट्वीटमध्ये लिहिले की, ‘मी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी बोललो. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. मी लष्करी संघर्षाबद्दल खोल चिंता व्यक्त केली आणि तणाव त्वरित कमी करण्यासाठी संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. मी प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरता लवकरात लवकर स्थापित करण्याची मागणी केली.’ त्यामुळे आता मोदींच्या विनंतीनंतर युद्ध थांबणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इराणचा आक्रमक पवित्रा

अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणने आक्रमक भूमिका घेत इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणकडून इस्रायलच्या दिशेने किमान 30 क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. तेल अवीव, हैफा आणि जेरुसलेम या शहरांवर इराणकडून हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे इस्रायलच्या अनेक भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी जनतेला होम फ्रंट कमांडच्या सूचनांचं पालन करण्यास सांगितलं आहे.

आज इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा 10 वा दिवस आहे. या युद्धात दोन्ही देशांना खूप नुकसान सहन करावे लागले आहे. पण दोन्ही देश अजूनही थांबायला तयार नाहीत. दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या या युद्धामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती वाढली आहे. इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची शक्यता कमी आहे, मात्र यामुळे प्रादेशिक अस्थिरता वाढत आहे.