AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाची परिस्थिती, भारतीयांसाठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना

Iran vs Israel : इराण-इस्रायल संबंध तणावात आहेत. हमास प्रमुख इस्माईल हनिया आणि हिजबुल्लाह कमांडर फुआद शुकर यांच्या हत्येनंतर मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणावाचे वातावरण तयार झाले आहे. दोन देश आमने-सामने आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी न जाण्याच्या सूचना भारताने दिल्या आहेत.

इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाची परिस्थिती, भारतीयांसाठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 03, 2024 | 6:55 PM
Share

इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव वाढला आहे. हमास प्रमुख इस्माईल हनिया याच्या हत्येनंतर इराणने इस्रायला धमकी दिली आहे. याचा बदला घेणार असल्याचं इराणने म्हटले आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये ही अलर्ट जारी करण्यात आला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे अनेक देशांनी या दोन्ही देशांचा प्रवास टाळावा अशा सूचना जारी केल्या आहेत. इस्रायलने मंगळवारी लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये हिजबुल्लाचा कमांडर फुआद शुकरला ठार केले आबे. इस्रायलने आपल्या शत्रूंना ठार करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. हमासचे अनेक मोठे नेते आणि दहशतवादी त्यांनी ठार केले आहेत. अजूनही त्यांचा शोध घेऊन त्यांना ठार केले जात आहे.

हत्येचा आरोप इस्रायलवर

इराणची राजधानी तेहरानमध्ये हमास प्रमुखाची हत्या केल्याने तणावात आणखी वाढ झाली आहे. या हत्येत इस्रायलचा हात असल्याचा दावा इराणने केला आहे. अधिकृतपणे फुआद शुकरच्या हत्येची जबाबदारी इस्रायलने घेतली आहे. पण हनियाच्या हत्येची जबाबदारी इस्रायलने घेतलेली नाही. आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांना भारत सरकारने सूचना जारी केल्या आहेत.  इस्त्रायल आणि इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांची चिंता ही वाढली आहे.

भारतीयांना सूचना जारी

भारतासह इतर अनेक देशांनी येथे प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तणाव वाढत असताना इस्रायलमधील भारतीय नागरिकांना सतर्क राहण्यास आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे. एअर इंडियाने इस्रायलमधील तेल अवीव येथे जाणारी आणि त्या मार्गाने जाणारी उड्डाणे स्थगित केली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी रात्री उशिरा सांगितले की, त्यांना या भागातील वाढत्या तणावाची चिंता आहे. हनियाच्या हत्येमुळे परिस्थितीत आणखी चिघळली आहे.

हमासला संपवण्याची शपथ

हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी हमासला समुळ नष्ट करण्याची शपथ घेतली होती. इस्रायलच्या पंतप्रधानांनी सांगितले होते की, हे युद्ध जरी हमासने सुरु केले असले तरी याचा शेवट आम्हीच करणार आहोत. इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादने आतापर्यंत अनेक शत्रूंना कंठस्नान घातले आहे. दुसऱ्या देशात जावून शत्रूंना संपवण्यात मोसाद तरबेज आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना