
इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर भयंकर युद्धाला सुरूवात झाली. या युद्धात अमेरिकेची मोठी कोंडी झाली. इराण घातक बनला असून इराणच्या गॅस सुविधांवर हल्ला इस्त्रायलने केल्यानंतर इराणने यूएई आणि कतारच्या ऊर्जा प्रकल्पांवर मोठा हल्ला करत आहे. कतारमधील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर हल्ला इराणकडून करण्यात आला. आता अमेरिकेने इस्त्रायल ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, आखाती देशांवर इराण ज्याप्रकारे हल्ले करत आहे, त्यानंतर दबाव वाढला आहे. दुसरीकडे होर्मुज खाडी इराणकडून ताब्यात घेण्यात आली. अमेरिका, इस्त्रायल आणि या देशांना युद्धात मदत करणाऱ्या देशांचे जहाज सोडणार नसल्याची भूमिका इराणची आहे. होर्मुज खाडीत मोठा जाम लागला आहे. तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून जागतिक बाजारपेठ अस्थिर झाली.
जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. सर्वच देशांकरिता होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकही देशाने डोनाल्ड ट्रम्प यांना साथ दिली नाही. चीनसह काही देशांना डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या युद्धनाैका होर्मुज खाडीत पाठवण्याची विनंती केली होती आणि हे देश मदत करतील असा विश्वासही दर्शवला होता.
एकही देश अमेरिकेच्या मदतीला पुढे आला नाही. अमेरिकेचे नागरिकही या युद्धाच्य विरोधात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ एकही अमेरिकन नागरिक पुढे येत नाही. इराणसोबतच्या युद्धाचा फास डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात फसल्याचे बघायला मिळत आहे. यादरम्यानच इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते, नासेर कनानी बघाई यांनी अमेरिकेच्या नागरिकांना इराणविरुद्धच्या युद्धाचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे.
कनानी यांनी म्हटले की, हे अमेरिकन लोकांसाठी युद्ध नाही आणि प्रत्येक जागरूक नागरिक व अधिकाऱ्याने याला विरोध करणे हे त्यांचे कर्तव्य असले पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे प्रमुख जो केंट यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे हे विधान आले आहे. त्यांनी म्हटले होते की ते या युद्धाला पाठिंबा देऊ शकत नाहीत.