
अमेरिका आणि इराण युद्धाला काही आठवडे पूर्ण झाली आहेत आणि हे युद्ध पुढेही काही दिवस सुरू राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण पराभव स्वीकारत नसून अमेरिका आणि इस्त्रायलला नाकीनऊ आणत आहे. इराणच्याही मोठ्या शहरांना टार्गेट करत हल्ले करण्यात आले. या युद्धात इराणच्या विरोधात आखाती देश अमेरिकेच्यासोबत होते. छुपा पाठिंबा त्यांचा या युद्धाला होता. मात्र, आता या युद्धाचा थेट फटका आखाती देशांना बसला असून अमेरिकेबद्दलची त्यांची भूमिका बदलली आहे. अमेरिकेने म्हटले होते की, इराणच्या हातात आता काहीच शिल्लक राहिले नसून त्यांची सर्व लष्करी ताकद संपली आहे. त्यानंतर इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी थेट हे युद्ध सुरू राहणार असल्याचे म्हटले. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून इराणने आपल्या हातात ठेवला असून तो बंद केला. यामुळे अमेरिकेवर प्रचंड दबाव आहे. भारत आणि इराणमधील वाटाघाटीनंतर भारताकरिता हा मार्ग खुला करण्यात आला. मात्र, आता इराणकडून यावर मोठे विधान करण्यात आले.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक मोठे विधान आले आहे. ज्यानंतर भारताचे टेन्शन वाढले आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारताचेही जहाज सोडले जात नसल्याने भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. आता यादरम्यानच इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी जहाजांना इराणी नौदलाशी समन्वय साधावा लागेल.
नाैदलासोबत बोलूनच तुम्ही जहाजांद्वारे तेल आणि वायू वाहतूक करू शकता. आता इराणकडून आलेल्या या विधानावरून हे स्पष्ट होते की, इराणी नाैदल होर्मुज सामुद्रधुनीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. इराणकडून भारताला स्पष्ट इशारा देत सांगण्यात आले की, नाैदलाची चर्चा करूनच त्यांना त्यांची जहाजे नेता येतील. इराणचा संकेत स्पष्ट आहे की, इस्त्रायल आणि अमेरिका आणि त्यांना समर्थन करणारे देश सोडून इतरांसाठी हा मार्ग खुला आहे.
इराणच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, काही देशांनी सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग काढण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला आणि चर्चा देखील झाली. आम्ही त्यांना सहकार्य केले. राहिला विषय इराणचा तर आमचा विश्वास आहे की, युद्धात सहकार्य करणाऱ्या देशांना होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्गाचा फायदा होऊ नये, याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे.