भारतासाठी रशिया बनला संकटमोचक, इराणची मोठी घोषणा, थेट भारताला..
इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजारात तेलाच्या किमती अस्थिर झाल्या. तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. त्यामध्ये होर्मुज खाडी पूर्णपणे बंद आहे. ऊर्जेचे संकट आहे. अमेरिका आणि इराण युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. स्थिती भयंकर होत आहे. इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात बैठक होती. मात्र, इराणने बैठकीस येण्यास नकार दिला. बैठकीची पूर्ण तयारी पाकिस्तानकडून करण्यात आली होती. मात्र, बिघडलेली परिस्थिती बघता इराणकडून बैठकीस उपस्थित राहण्यास नकार देण्यात आला. दोन आठवड्यांकरिता लावण्यात आलेली युद्धबंदी उठण्यासाठी काही तास शिल्लक असताना अमेरिकेने मोठी घोषणा करत युद्धबंदी काही दिवसांसाठी पुढे ढकलली. अमेरिका किंवा इस्त्रायल कोणताही हल्ला इराणवर करणार नाही. होर्मुज खाडीत भारताचे अनेक जहाज अडकले आहेत. जग संकटात असताना यादरम्यान रशिया भारताच्या मदतीला धावून आला. युद्धाला सुरूवात झाल्यानंतर अमेरिकेने रशियाच्या तेलावरील निर्बंध हटवले. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू केली. युद्धाच्या स्थितीत रशिया भारताला मोठ्या संख्येने तेल पुरवठा करत आहे.
काही देशांमध्ये युद्धाच्या स्थितीत तेलाची मोठी समस्या आहे. लॉकडाऊनची स्थिती आहे. रशियाने भारताची साथ दिली. यादरम्यानच इराणकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. इराणने स्पष्ट शब्दात म्हटले की, आम्ही होर्मुज खाडीतून रशियाच्या जहाजांना सुरक्षित रस्ता देणार आहोत. इराणकडून करण्यात आलेल्या या घोषणेनंतर भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.
हेच नाही तर इराणकडून सांगण्यात आले की, होर्मुज खाडीतून रशियाच्या जहाजांना विशेष सुरक्षा पुरवली जाईल. इराणने केलेल्या या घोषणेचा थेटपणे फायदा भारताला होणार आहे. रशियातून मोठ्या संख्येने भारतात कच्चे तेल दाखल होत आहे. रशियाच्या जहाजांना इराण होर्मुज खाडीतून सुरक्षित रस्ता देणार आहे. त्यामध्येच भारतात कच्चे तेल दाखल होत आहे.
रशिया आणि इराण यांच्यात फार जुने संबंध आहेत. युद्धात इराणला रशिया मदत करत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यामध्येच इराणकडून रशिया आश्वासन देण्यात आले. भारतात एलपीजीचे संकट आहे, त्यातून मार्ग काढला जात आहे. इराण आणि अमेरिका युद्ध एक महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून सुरू काही. दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता त्याला मुद्दतवाढ देण्यात आली.