
जून महिन्यात इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध झाले होते. यात दोन्ही देशांनी एकमेकांवर शक्तिशाली हल्ले केले होते. तब्बल 12 दिवसांनंतर हे युद्ध थांबले होते. यानंतर आता इराण आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. इराणने कोणतीही अधिकृत घोषणा न करता एक क्षेपणास्त्र चाचणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. सेमनान प्रांतातील इमाम खोमेनी स्पेसपोर्टवर ही चाचणी पार पडली आहे. असोसिएटेड प्रेसने उपग्रहांद्वारे घेण्यात आलेल्या फोटांद्वारे या चाचणीची माहिती समोर आली आहे.
इस्रायलसोबत झालेल्या यु्द्धानंतर इराण आपली ताकद आणखी वाढवत आहे. इराणने सेमनान प्रांतात मिसाईलची चाचणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. 18 सप्टेंबर रोजी सेमनान प्रांतावर आकाशात रॉकेटसारखी रेषा दिसली होती. त्यानंतर उपग्रहाने घेतलेल्या फोटोंमध्ये लाँच पॅडवर काही तरी जळले असल्याचे चिन्ह दिसून आले आहे, जे मागील क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर उमटलेल्या खुणांसारखे आहे. त्यामुळे इराणने गुप्तपणे चाचणी केली असल्याचे बोलले जात आहे, मा्त्र सरकारने यावर भाष्य केलेले नाही.
इराणमधील खासदार मोहसेन झांगनेह यांनी एका वृत्तवाहिणीवर बोलताना इराणने इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) चाचणी केली असल्याची माहिती दिली आहे. हा इराणची वाढणारी ताकद आहे असं त्यांनी म्हटलं आहे, मात्र त्यांना या चाचणीचा कोणताही पुरावा दिला नाही. समोर आलेल्या माहितीनुसार आयसीबीएमची रेंज 5500 किमी पेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता इराण आयसीबीएमद्वारे युरोपातही हल्ले करण्यात सक्षम आहे, त्यामुळे इस्रायल अमेरिका आणि नाटोची चिंता वाढली आहे.
दरम्यान, इराणने नेमकी कोणती चाचणी केली हे अद्यार स्पष्ट झालेले नाही. इराणने यापूर्वी अवकाशात उपग्रह पाठवू शकणारे झुलजानाह नावाचे रॉकेट वापरले होते. अमेरिकेला चिंता आहे की इराण या तंत्रज्ञानाचा वापर करून आयसीबीएम देखील विकसित करेल. मात्र अद्याप इराणणे कोणती चाचणी केली हे स्पष्ट झालेले नाही. जर ही चाचणी यशस्वी झाली असेल तर इराण याबाबत लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.