AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प यांच्या एकाच हल्ल्याने इराण 10 वर्षे मागे, आता फक्त पाकिस्तान… निवृत्त कर्नल अभय पटवर्धन काय म्हणाले?

अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर केलेल्या हल्ल्यानंतर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी आपले विश्लेषण मांडले आहे. या हल्ल्यामुळे इराणचे अण्वस्त्र कार्यक्रम दहा वर्षे मागे ढकलला आहे, असे त्यांचे मत आहे.

ट्रम्प यांच्या एकाच हल्ल्याने इराण 10 वर्षे मागे, आता फक्त पाकिस्तान... निवृत्त कर्नल अभय पटवर्धन काय म्हणाले?
trump and khamenei
| Updated on: Jun 22, 2025 | 12:42 PM
Share

सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु आहे. दररोज दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. आता या हल्ल्यात अमेरिकाही उतरली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान या अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत इराणला इशारा दिला. हे एक यशस्वी ऑपरेशन आहे. फॉर्डो सेंटर हा इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाचा महत्त्वाचा हिस्सा होता, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. यावर आता निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर केलेला हल्ला हा खऱ्या अर्थाने ‘सर्जिकल स्ट्राइक’ होता, कारण अमेरिकेने इराणची अण्वस्त्रे बनवण्याची ठिकाणे (क्लीनली अण्वस्त्र स्थळं) नष्ट केली आहेत, असे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी म्हटले आहे. अमेरिकेने इराणला अण्वस्त्र निर्मिती थांबवण्याचा किंवा गंभीर परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा आधीच दिला होता.

कर्नल पटवर्धन यांच्या मते, अमेरिकेने इराणला दोन आठवड्यांत वाटाघाटीच्या टेबलावर येण्यास सांगितले होते, अन्यथा मला माहीत आहे काय करायचे आहे ते असा इशारा दिला होता. याच इशाऱ्यानंतर अमेरिकेने रात्री हा हल्ला करत युरेनियमचे अण्वस्त्रांमध्ये रूपांतर करणाऱ्या प्लांटला नष्ट केले. हा प्लांट मोकळा सोडला असता, तर त्यांचे आणखी अण्वस्त्र बनवण्याचे काम सुरू झाले असते. मात्र आता ते दहा वर्षे मागे गेले आहेत,” असे कर्नल पटवर्धन म्हणाले. आता जगात फक्त पाकिस्तानच अण्वस्त्रधारी देश राहिला आहे.

कर्नल पटवर्धन यांनी सांगितले की, अमेरिकेने पाकिस्तानी जनरल मुनीरला जेवायला बोलावले. त्याचवेळी त्यांना इराणसोबत काय केले हे दाखवून दिले. याचा उद्देश पाकिस्तानने अण्वस्त्रांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास असेच परिणाम होतील, हे दाखवून देणे हा होता. यातून अमेरिकेने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

जागतिक युद्धाची शक्यता कमी

जागतिक युद्धाची शक्यता आता कमी असल्याचे कर्नल पटवर्धन यांचे मत आहे. इराणला समर्थन देणाऱ्या चार देशांपैकी तुर्कीस्तान हा नाटोचा सदस्य असल्याने त्याला नाटोमधून बाहेर पडावे लागेल. चीन इराणकडून मोठ्या प्रमाणात तेल घेत असला तरी, तो सध्या तैवानमध्ये अडकलेला आहे, त्यामुळे तो थेट कारवाई करणार नाही. रशिया युक्रेन युद्धात गुंतलेला आहे, तर उत्तर कोरिया थेट अमेरिकेवर क्षेपणास्त्र टाकू शकतो, पण इतर ठिकाणी तो काही करेल असे वाटत नाही.

इराणकडे अजूनही तीन ते साडेतीन हजार क्षेपणास्त्रे आहेत. ते हल्ला करू शकतात. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की यापुढे इराणने काही करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या प्रत्येक संस्थेवर किंवा साइटवर अमेरिकेची नजर आहे. त्या साईट पूर्णपणे नष्ट केल्या जातील, याची भनकही त्यांना लागू दिली जाणार नाही. त्यामुळे पुढील कृती काय असेल यावर सर्व अवलंबून आहे. पुढील ४८ तासांनंतर नेमके काय होणार हे स्पष्ट होईल, असे कर्नल पटवर्धन यांनी सांगितले.

अमेरिकेवर हल्ला करणे त्यांच्यासाठी सोपे नाही

इराणने याआधी ‘तुम्ही सुरू केले आम्ही संपवू’ अशी धमकी दिली होती. इराणमध्ये १० ते १५ दिवसांत अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता होती, पण आता ते सर्व नष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता अमेरिकेवर हल्ला करणे त्यांच्यासाठी सोपे राहिलेले नाही. इराणने इस्रायलवर २०० ते २५० क्षेपणास्त्रे डागली, पण त्यापैकी फक्त ४० ते ५० क्षेपणास्त्रे पाडण्यात आली आणि त्याचा फारसा परिणाम झाला नाही, असे कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.