
इराणची राजधानी तेहरान येथे तुर्कीचे परराष्ट्र मंत्री आणि सौदी अरबचे परराष्ट्र सचिव यांच्या उपस्थितीने मध्य पूर्वेत राजकारण ढवळलं गेलं आहे. तिन्ही देशांची बैठक अशा वेळत होत आहे, जेव्हा इस्रायलने सिरिया आणि लेबनॉनवर हल्ले तीव्र केले आहेत. आणि इस्रायलच्या मीडियाने इस्रायल पुन्हा इराणवर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
मैहर न्यूजच्या मते तुर्कीचे परराष्ट्रमंत्री हकीम फिदान यांनी सोमवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची भेट घेतली आहे. दोघांनी मुलाखतीनंतर अनेक करारावर सह्या केल्या आहेत. या भेटीच्या काही वेळानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सौदीचे परराष्ट्र सचिवांची तेहरानमध्ये भेट घेतली आहे.
इराण, तुर्की आणि सौदी अरब यांना मध्य पूर्वेत खूप महत्वाचे स्थान आहे. इस्राईलनंतर याच तिन्ही देशांकडे मध्य पूर्वेत जास्त सैन्य बळ आहे.
अलिकडेच पाकिस्तानशी करार केल्यानंतर सौदी अरब आण्विक शक्ती संपन्न देश बनला आहे.
तुर्की देखील नाटो कंट्री आहे, ज्यामुळे त्याच्याजवळ मजबूत सुरक्षा कवच आहे. नाटोमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स सारखे २८ देश सामील आहेत. नाटोच्या कोणत्याही देशावर कोणी हल्ला केला तर हा हल्ला त्या सर्व २८ देशांवरील मानला जातो.
इराणकडे क्षेपणास्रांचा साठा आहे. एका अंदाजानुसार इराणच्या जवळ सुमारे ३००० बॅलेस्टिक क्षेपणास्रे आहेत. इराणला चीन आणि रशिया सारख्या देशांचे समर्थन मिळालेले आहे.
तेहरानमध्ये आतापर्यंत इराणने सौदी आणि तुर्की यांच्या वेगवेगळ्या बैठका केल्या आहेत. या बैठकांचे जे विवरण जारी केले आहे, त्याच्या मते तुर्कीसोबत इराणने रेल्वे नेटवर्क बनवण्यासाठी एक करार केला आहे. इराणी मीडियाच्या मते तेहराणमध्ये तुर्कीने इस्राईल सरकारचा धिक्कार केला आहे.
या बैठकीत तुर्कीने इराणचे राष्ट्रीय सार्वभौमत्व, क्षेत्रीय अखंडता आणि एकतेचा सन्मान करण्याच्या गरजेवर जोर दिला आहे. तुर्कीचे एक परराष्ट्रमंत्री फिदान यांनी म्हटले आहे की आपण विभागलो गेलो आहोत. याचा फायदा इस्राईल उचलत आहे. जर आपण एकत्र झालो तर इस्रायलचे नुकसान होईल.
इराण आणि सौदी दरम्यान जी बातचीत झाली. त्याची माहिती बाहेर आलेली नाही.परंतू असे म्हटले जात आहे की इराणच्या अंतर्गत सुरक्षे संदर्भात सौदीने बैठक घेतली आहे. सौदीचा प्रयत्न इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान अणूचर्चा करण्याचा आहे. दोघांमध्ये यावरुन बराच काळापासून संघर्षाची स्थिती आहे.