AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाला सुरुवात…? इराणचा इस्रायलवर ड्रोन अटॅक, एअरस्पेस बंद; जॉर्डनमध्ये आणीबाणी घोषित

इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. इराणने इस्रायलवर हल्ला चढवला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सच्या दाव्यानुसार इराणने इस्रायलच्या दिशेने 100 अधिक ड्रोनचा मारा केला आहे. हे ड्रोन इस्रायलपर्यंत पोहोचेपर्यंत आणखी काही तास जाणार आहे. मात्र, ड्रोन निशाण्यावर लागताच इस्रायलचं मोठं नुकसान होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

युद्धाला सुरुवात...? इराणचा इस्रायलवर ड्रोन अटॅक, एअरस्पेस बंद; जॉर्डनमध्ये आणीबाणी घोषित
| Updated on: Apr 14, 2024 | 3:51 AM
Share

जगात पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली आहे. मात्र, यावेळचं युद्ध अत्यंत भयानक असेल अशी चिन्हं दिसत आहेत. इराण आणि इस्रायलच्या दरम्यान प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव इतका टोकाला गेला आहे की, इराणने आज इस्रायलवर ड्रोन हल्ला केला आहे. इराणने इस्रायलच्या दिशेने 100 हून अधिक ड्रोनचा हल्ला केला आहे. त्यामुळे आयडीएफने एअरस्पेस बंद केलं आहे. तर जॉर्डनमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. इराणच्या या हल्ल्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने हायअॅलर्ट जारी केला आहे. तसेच डिफेन्स फोर्स सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून आहे. इस्रायली एअरफोर्स फायटर जेट आणि इस्रायली नौदलाच्या जहाजांसोबतच आयडीएफने एरिअल डिफेन्स एरेलाही हायअलर्टवर ठेवलं आहे. इस्रायलचे नौदल आणि हवाई दल डोळ्यात तेल घालून निगराणी करत आहेत. तर दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांनी तेल अवीवच्या किरयामध्ये वॉर कॅबिनेडची मिटिंग बोलावली आहे.

तर, इराण आणि इस्रायलच्या दरम्यान होणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांनी नॅशनल सिक्युरिटी टीमच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये मिटिंग बोलावली आहे. इस्रायलवर ड्रोन हल्ला केल्यानंतर इराणचे नेते खामेनेई यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ जारी केला आहे. दुष्ट शासनाला शिक्षा केलीच जाईल, असं खेमेनई यांनी म्हटलं आहे.

गंभीरच नव्हे, खतरनाक परिस्थिती

इराणच्या भूमीतून आमच्यावर थेट हल्ला करण्यात आला आहे. आम्ही इराणने पाठवलेल्या ड्रोनवर नजर ठेवून आहोत. ही गंभीरच नव्हे तर खतरनाक परिस्थिती आहे. इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमचं संरक्षण करण्यासाठी हाय अलर्टवर आहोत. हे एक मिशन असून आम्ही पूर्णपणे हे मिशन यशस्वी करू, असं आयडीएफचे प्रवक्ते डॅनियल हागारी यांनी म्हटलं आहे.

जॉर्डन आणि लेबनानचे एअर स्पेस बंद

दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर जॉर्डन आणि लेबनानने अनिश्चित काळासाठी विमानतळ बंद केले आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण थांबवण्यात आलं आहे. डझनभर ड्रोन इस्रायलच्या दिशेने जाताना पाहिले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही दोन्ही विमानतळे बंद ठेवण्यात आली आहे. आम्ही इराणचे विमान किंवा ड्रोन पाडण्यासाठी सज्ज आहोत. त्यासाठी लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. रडार सिस्टीम ड्रोनच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे, असं इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे. तर जॉर्डनने आणीबाणी जाहीर केली आहे.

Follow Us
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन; त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद