AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayatollah Ali Khamenei Family : कोणाचा मृत्यू, कोण बचावले, आयातुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबात एकूण किती सदस्य?

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इराणने ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला असून, खामेनेईंच्या कुटुंबातील सदस्यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे

Ayatollah Ali Khamenei Family : कोणाचा मृत्यू, कोण बचावले, आयातुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबात एकूण किती सदस्य?
Ali Khamenei
| Updated on: Mar 01, 2026 | 9:05 AM
Share

इराणमधील सत्तासंघर्षाला आता एक मोठे वळण लागले आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई यांच्या परिवारातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे पश्चिम आशियातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती इराणच्या प्रेस टीव्हीने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने ऑपरेशन न्यू ऑर्डर अंतर्गत तेहरानमधील खामेनेई यांच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निवासस्थानाला टार्गेट केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर सर्वात आधी आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. इराणी जनतेसाठी आपला देश परत मिळवण्याची ही सर्वात मोठी संधी आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

मोज्तबा खामेनेई हल्लातून बचावल्याचा दावा

इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, या भीषण हल्ल्यात केवळ अली खामेनेईच नाहीत, तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही ठार झाले आहेत. यामध्ये खामेनेई यांची एक मुलगी, एक नातू, नात, सून आणि जावई यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनेई हे या हल्ल्यातून बचावले की नाही, याची अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र ते सुरक्षित असल्याचे दावे केले जात आहेत.

आयातुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबातील प्रमुख सदस्य कोण?

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचे कुटुंब अत्यंत मोठे आणि प्रभावशाली आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रमुख सदस्य कोण, याची माहिती समोर आली आहे. आयातुल्ला अली खामेनेई यांचा परिवार खूप मोठा आहे. त्यांची पत्नी, चार मुले, तीन मुली आणि नातवंडं असा परिवार आहे. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या पत्नीचे नाव मन्सुरे खजस्ते बागेरजादेह असून त्या सार्वजनिक जीवनापासून नेहमीच दूर राहिल्या आहेत. त्या एका व्यावसायिक कुटुंबातून येतात. त्यांना चार मुलं आहेत. मोज्तबा खामेनेई, मुस्तफा खामेनेई, मसूद खामेनेई, मेसम खामेनेई अशी या चौघांची नावे आहेत.

मोज्तबा खामेनेई हे खामेनेईंचे दुसरे चिरंजीव असून त्यांना त्यांच्या वडिलांचे उत्तराधिकारी मानले जाते. इराणच्या गुप्तचर यंत्रणांवर त्यांचे पूर्ण नियंत्रण आहे, असे म्हटले जाते. तसेच खामेनेईंना बुशरा, होदा आणि मेसम अशा तीन मुली आहेत. त्या अत्यंत खाजगी आयुष्य जगतात आणि राजकारणापासून दूर राहतात. आयातुल्ला अली खामेनेई यांना अनेक नातवंडे आहेत. त्यापैकी मोहम्मद बाघेर खामेनेई हे एका नातवाचे नाव असून आता झालेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

आयातुल्ला अली खामेनेई यांची बहीण बदरी खामेनेई यांनी अनेकदा आपल्या भावाच्या धोरणांचा जाहीर निषेध केला आहे. तसेच त्यांना एक पुतण्या असून महमूद मोरादखानी हे सध्या पॅरिसमध्ये निर्वासित आहेत. ते खामेनेई राजवटीचे कट्टर विरोधक आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...