हे 8 लोक आहेत इराणचे मास्टर माइंड, महासत्ता अमेरिकेच्या आणले नाकीनऊ, पाचवं नाव तर सर्वात खतरनाक

Iran Top Leaders : युद्धात इराणचे तत्कालिन सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे कमांडर यांचा मृत्यू झाला आहे. आता इराणचे नेतृत्व कोण करत आहे ते जाणून घेऊयात.

हे 8 लोक आहेत इराणचे मास्टर माइंड, महासत्ता अमेरिकेच्या आणले नाकीनऊ, पाचवं नाव तर सर्वात खतरनाक
Iran vs US Leaders
Image Credit source: Google
| Updated on: May 06, 2026 | 6:13 PM

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात इराणचे तत्कालिन सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे कमांडर यांचा मृत्यू झाला आहे. मात्र तरीही इराणने अमेरिकेला नाकीनऊ आणले आहे. या युद्धात इराणच्या नेत्यांनी तगजी रणनीती आखत युद्धात अमेरेकेला चांगली टक्करे दिली आहे. 1979 च्या क्रांतीतून निर्माण झालेल्या या देशाने अत्यंत गुंतागुंतीची सत्ताकाठाची रचना उभी केली होती. ही रचना काही व्यक्तींवर अवलंबून नसून अनेक स्तरांवरील संस्थांपासून बनलेली आहे, जी या धर्माधारित व्यवस्थेला टिकवून ठेवण्यासाठी कार्य करते. मुख्य नेत्यांच्या मृत्यूनंतर इराणची सूत्रे कुणाच्या हातात आहेत ते जाणून घेऊयात.

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई हे या युद्धाच्या सुरुवातीला मारले गेले. त्यानंतर खामेनेई यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांच्याकडे सर्वोच्च नेते पदाची जबाबदारी देण्यात आली. परंतु त्यांच्याकडे वडिलांसारखे स्वयंसिद्ध अधिकार नाहीत. शत्रूच्या हल्ल्यांमध्ये ते जखमी झाले असून त्यांनी आतापर्यंत फक्त दोन लिखित निवेदने जारी केली आहेत, ज्यामुळे त्यांच्या स्थितीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

IRGC ची भूमिका काय?

इराणमध्ये इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) चा प्रभाव गेल्या अनेक दशकांत वाढत आहे. अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर आणि मोजतबा खामेनेई यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी रणनीतिक निर्णयांमध्ये अधिक केंद्रस्थानी भूमिका घेतली आहे. या संघटनेने मोजेक प्रकारची रचना तयार केली आहे, ज्यात प्रत्येक कमांडरसाठी पर्याय निश्चित केलेले आहेत आणि प्रत्येक युनिट स्वतंत्रपणे काम करू शकते.

राजकीय नेतृत्वाची भूमिका

इराणच्या राजकीय व्यवस्थेत धार्मिक नेतृत्वासोबत निवडून आलेला राष्ट्राध्यक्ष आणि संसद देखील आहे. रिव्होल्यूशनरी गार्ड्ससोबत हे सर्व मिळून देश चालवतात. अली लारीजानी यांची हत्या हा मोठा धक्का मानला जातो. तसेच रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे नौदल प्रमुख अलीरेजा तांगसिरी यांचाही मृत्यू झाला आहे. आता इराणच्या धोरणांबाबत खालील नेते महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहेत.

सध्या निर्णय घेणारे प्रमुख नेते

  1. अहमद वाहिदी – रिव्होल्यूशनरी गार्ड्स प्रमुख
  2. इस्माइल कानी – कुद्स फोर्स प्रमुख
  3. मोहम्मद बागेर गालिबाफ – संसद अध्यक्ष
  4. गुलामहुसैन मोहसिनी-एजेई – न्यायपालिका प्रमुख
  5. मसूद पेजेशकियन – राष्ट्राध्यक्ष
  6. सईद जलीली – माजी राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख
  7. अलीरेजा अराफी – गार्डियन कौन्सिल सदस्य
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us