AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुजबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्देश काय ? संपूर्ण जग..

US-Iran War : आमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज सामुद्रधुनीबद्दल महत्वाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे जगाला मोठा धक्का बसला असून मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

होर्मुजबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्देश काय ? संपूर्ण जग..
होर्मुजच्या सामुद्रधुनीबाबत ट्रम्प यांचा निर्णय काय ?Image Credit source: social media
| Updated on: May 06, 2026 | 9:27 AM
Share

28 फेब्रुवारी पासून अमेरिका-इराणमध्ये सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठीच्या वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात आहेत. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली होती, शांतेच्या चर्चाही सुरू होत्या. मात्र मध्येच काही कुरबुरू, घडामोडी घडल्याने दोन्ही देशांत पुन्हा युद्ध सुरू होतं की काय अशी भीती जगाला वाटू लागली. मात्र सध्या तरी सगळं शांत आहे. एकीकडे चर्चा, वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र त्याचदरम्यान दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी मध्यपूर्वेतील व्यापारी जहाजांचे संरक्षण करणाऱ्या ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ या नौदल मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिल्याचे जाहीर केलं आहे. मात्र, इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जगाला मोठा धक्का बसू शकतो.

‘ट्रुथ’ नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी याबद्दल लिहीलं. ” (शांतता) करारासंदर्भात इराणी प्रतिनिधींसोबतच्या वाटाघाटी प्रगतीपथावर आहेत.” असं त्यांनी नमूद केलं. मात्र इराणसोबतचा करार अंतिम करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेले ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ हे अभियान आपण तात्पुरते थांबवले असल्याचा दावा ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये केला.

काय म्हणाले ट्रम्प ?

‘इराणविरुद्धच्या मोहिमेत मिळालेल्या प्रचंड लष्करी यशाच्या आणि शांतता करारासाठी इराणी प्रतिनिधींसोबत झालेल्या चांगल्या चर्चेच्या आधारावर, पाकिस्तान व इतर देशांच्या विनंतीवरून आम्ही परस्पर संमतीने ठरवले आहे की, नाकेबंदी पूर्णपणे लागू राहील. परंतु एखादा करार अंतिम होऊ शकतो का हे पाहण्यासाठी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ काही काळासाठी थांबवला जाईल.’ असं त्यांनी पोस्टमध्ये लिहीलं.

‘प्रोजेक्ट फ्रीडम’ म्हणजे काय ?

ट्रम्प प्रशासनातर्फे ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ सुरू करण्यात आलं, जे मिलिट्री ऑपरेशन होतं. इराणसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांचा सुरक्षित मार्ग पुन्हा प्रस्थापित करणं, हा या ऑपरेशनचा याचा उद्देश आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांचा सुरक्षित मार्ग सुनिश्चित करणे हेचं ऑपरेशनचं ध्येय किंवा लक्ष्य आहे. मात्र इराणने गेल्या काही आठवड्यांत जहाजांवर अनेक हल्ले केले आहेत असा अमेरिकेचा आरोप आहे.

संपूर्ण जगासाठी होर्मुझची सामुद्रधुनी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे, कारण जगातील जवळपास एक पंचमांश तेल याच मार्गाने जाते. त्यामुळे, या सामुद्रधुनीची सुरक्षा संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अमेरिकेने या मोहिमेसाठी एक मोठी लष्करी शक्ती तैनात केली आहे, ज्यामध्ये 15 हजारांहून अधिक सैनिक, क्षेपणास्त्रवाहू विनाशिका, हेलिकॉप्टर्स आणि 100 हून अधिक विमानांचा समावेश आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी