Iran Ukraine conflict : जगापासून लपलेली गोष्ट अखेर समोर, तीन ठिकाणी होणार होते हल्ले, एक घटना घडली अन्… काय घडतंय?
इराण आणि युक्रेनमधील मोठा संघर्ष आता समोर आला आहे. कॅस्पियन समुद्रात इराणी जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याने तणाव वाढला आहे. युक्रेनने हल्ल्याची चूक कबूल केली असली तरी, इराणच्या दाव्यानुसार, युक्रेनवर तीन ठिकाणी हल्ला करण्याची योजना होती. ही गुप्त माहिती उघड झाल्याने दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इराण आणि युक्रेन दरम्यानचं एक मोठं सत्य समोर आलं आहे. जगापासून लपून राहिलेली गोष्ट अखेर उघड झाली आहे. कॅस्पियन महासागरात एका इराणी व्यावसायिक जहाजावर ड्रोन हल्ला झाल्यामुळे इराण आणि युक्रेनमध्ये तणाव वाढला आहे. 25 जुलै रोजी झालेला हल्ला चुकून झाल्याचं युक्रेननं म्हटलं आहे. पण इराण या दाव्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये. हल्ला जाणूनबुजून केल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत, असं तेहरानचं म्हणणं आहे. सुप्रीम लीडर अली खामेनेईच्या एका सीनियर सैन्य सल्लागाराच्या दाव्यानुसार, इराणने युक्रेनच्या तीन ठिकाणावर हल्ला करण्याचा प्लान केला होता. पण युक्रनने कथितपणे माफी मागितल्याने हे ऑपरेशन रद्द झालं. ही माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. इराणने जर हा हल्ला केला असता तर पुन्हा एकदा जगात हाहा:कार उडाला असता असं जाणकार सांगतात.
इराण सध्या युक्रेनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. जहाजावरील हल्ल्याला युक्रेनच जबाबदार आहे. युक्रेनला जबाबदार धरण्यासाठी आम्ही उचित कारवाई करणार असल्याचा इशाराच इराणने युक्रेनला दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इराण आणि युक्रेनमध्ये काय घडतंय याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
इराणने काय म्हटलं?
इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई यांनी सोमवारी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. कॅस्पियन समुद्रात आमच्या जहाजावर हल्ला करण्यात आला. त्यावर युक्रेनने हल्ला चुकून झाल्याचं म्हटलं आहे. पण त्याबाबतचे काही ठोस पुरावे युक्रेन देणार की नाही हे आम्ही पाहणार आहोत, असं इस्माइल बघाई यांनी म्हटलंय. दोन्ही देशाच्या विदेश मंत्र्यांनी फोनवरून संपर्क केला. तेव्हा इराणी अधिकाऱ्यांनी हा हल्ला जाणूनबुजून केला नसल्याचं वारंवार सांगितल्याचंही बघाई यांनी म्हटलंय.
मेळच खात नाही
युक्रेनने कितीही दावा केला असला तरी आमच्याकडे असे पुरावे आहेत की जे युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या दाव्याशी अजिबात मेळखात नाहीत. त्यात युक्रेनच्या राष्ट्रपतींचं सार्वजनिक विधानही आहे. त्यावरून हल्ला त्यांनीच केल्याचं स्पष्ट होत असल्याचंही बघाई यांनी सांगितलं.
इराणच्या जहाजावर हल्ला झाल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमिर जेलेन्स्की यांनी एक्सवर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी यूक्रेनने रशियाच्या सैन्य ठिकाण्यावर दूरवरून हल्ला केल्याचं म्हटलं होतं. या हल्ल्यात कॅस्पियन महासागराशी संबंधित काही ठिकाणेही असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर हा वाद सुरू झाला आहे.