इराणमध्ये हाहाकार! थेट धक्कादायक अहवाल पुढे, अमेरिकेसोबतच्या युद्धात परराष्ट्र मंत्र्यांना..
इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच आता खळबळ उडवणारी बातमी पुढे येत आहे. इराणीमध्ये कलह सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे.

अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावात इराणमधून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. इराणमध्ये युद्धादरम्यान मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. नुकताच मिळालेल्या अहवालानुसार, इराणी सरकारमध्ये मोठी फूट पडली. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची तयारी सुरू केली आहे. हा मोठा धक्का म्हणावा लागेल. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान दाैऱ्यावर होते. पाकिस्तानमधून ते थेट रशियाला पोहोचले. अब्बास अराघची यांच्याकडून युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सध्याच्या घडीला इराणमध्ये फूट पडल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, या रिपोर्टवर इराणी सरकारकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
ब्रिटिश माध्यम संस्था इराण इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, अराघची यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आली. त्यांच्याविरोधात एक गट सक्रिय झाला. यासोबतच अराघची हे राष्ट्रपतींच्या कार्यालयाला उत्तरदायी न राहता परराष्ट्र मंत्रालय स्वतंत्रपणे चालवत आहेत. परराष्ट्र मंत्री अधिकृत मंत्रिमंडळाच्या धोरणांऐवजी रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या निर्देशांचे पालन करत आहेत, असाही आरोप आहे.
याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर अराघची यांची खुर्ची जाण्याची मोठी शक्यता आहे. अध्यक्ष पेझेश्कियान यांचे म्हणणे आहे की, महत्त्वाच्या राजनैतिक चर्चांमध्ये परराष्ट्र मंत्री अराघची यांनी सरकारऐवजी लष्कराची आयआरजीसीची बाजू घेतली आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर अराघची यांना पदावरून हटवले जाईल. सूत्रांच्या दाव्यानुसार, अराघची हे रिव्होल्यूशनरी गार्डचे कमांडर अहमद वाहिदी यांचे सहकारी म्हणून काम करत आहेत. अध्यक्षांच्या नकळत त्यांच्या रणनीतींची अंमलबजावणी करत आहेत. ज्यामुळे त्यांचे पद जाण्याची शक्यता आहे.
अमेरिकेसोबत मोठे युद्ध सुरू असतानाच इराणमध्ये दोन गट पडल्याचे बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अराघची युद्धविरामासाठी इराणची बाजू मांडत आहे. मात्र, आता थेट त्यांच्या भूमिकेवरच संशय घेतला जात आहे. या वादावर इराण सरकारने काहीही भाष्य केले नाही. मात्र, इराणमध्ये मोठा राजकीय भूकंप कधीही होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.