अख्खं जग युद्धाच्या खाईत लोटलं जाणार? इराणची थेट धमकी, ‘ही’ एक चूक होताच होणार मोठा अनर्थ!

इराण इस्रायल यांच्यातील युद्धाचा भडका जगभरात पोहोचतो आहे. इराणने दिलेल्या इशाऱ्यानंतर आता संपूर्ण जग युद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अख्खं जग युद्धाच्या खाईत लोटलं जाणार? इराणची थेट धमकी, ही एक चूक होताच होणार मोठा अनर्थ!
iran and israel war
| Updated on: Jun 15, 2025 | 8:03 PM

Israel And Iran War : इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध चांगलेच पेटले आहे. आता या युद्धाची धग अन्य देशांनाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषत: मध्य पूर्वेतील देश या युद्धात भरडले जाऊ शकतात. इस्रायलला कोणी मदत केली तर आम्ही त्याला सोडणार नाही. आम्ही संबंधित देशांवरही हल्ला करू असा इशाराच इराणने दिला आहे. अमेरिका आणि ब्रिटन या दोन देशांना केंद्रस्थानी ठेवून इराणने हा इशारा दिलाय. त्यामुळे आता नेमकं काय होणार? याकडे समस्त जगाचे लक्ष लागले आहे.

मध्य पूर्वेतील अमेरिकेने इस्रायलला हल्ला करण्यास मदत केली तर आम्ही अमेरिका तसेच ब्रिटनच्या लष्करी तळांवर हल्ला करू असे इराणने बजावले आहे. विशेष म्हणजे फक्त इस्रायलच नव्हे तर पश्चिमी देशांची साथ देणाऱ्या मुस्लीम राष्ट्रांनी आम्ही लक्ष्य करू असा इशारा इराणने दिलाय.

अमेरिका, ब्रिटनची लष्करी तळं धोक्यात

इराणने दिलेल्या या धमकीनंतर आता मध्य पूर्वेत तणाव वाढण्याची शक्यता आहे. कारण या भागात अमेरिका आणि ब्रिटन या देशांची अनेक लष्करी तंल आहेत. याच लष्करी तळांना उडवण्याची धमकी इराणने दिली आहे. ब्रिटनची लष्करी तळं ही इराक आणि सिरीयामध्ये आहेत. ब्रिटनचे लष्कर तिथे आयएसआयएसविरोधातील लढाईत सहभागी आहे. तर यूएई, कतार, बहरीन, ओमान यासारख्या या देशांतही ब्रिटीश फौजा आहेत. त्यामुळे इराणच्या या इशाऱ्यानंतर ब्रिटनची चिंता वाढली आहे.

अमेरिका, ब्रिटनचे सैन्य कोणत्या देशांत आहे

दुसरीकडे मध्य पूर्वेत अमेरिकेची साधारण 19 ठिकाणी लष्करी अस्तित्व आहे. यामध्ये बहरिन, इजिप्त, इराक, जॉर्डन, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, यूएई यांचा समावेश आहे. या भागात अमेरिकेचे साधारण 40 ते 50 हजार सैनिकं आहेत. यातील बहुसंखय सैनिक हे कतार, बहरीन, कुवैत, यूएईमध्ये आहेत. त्यामुळे इराणच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचेही चिंता वाढू शकते.

मुस्लीम राष्ट्रांवर होणार हल्ले?

दरम्यान, वर उल्लेख केलेल्या देशांत तैनात असलेल्या अमेरिका आणि ब्रिटनच्या लष्कराचा वापर इराणविरोधात झाला तर इराणकडूनही जशास तसे प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. म्हणजेच इराण मुस्लीम राष्ट्रांवरही हल्ला करू शकते. तसा थेट इशाराच इराणने दिलाय. असे प्रत्यक्षात घडले तर इस्रायल आणि इराण हा संघर्ष फक्त दोन देशांपुरताच सीमित नसेल. हा संघर्ष जागतिक पातळीवरही पोहोचू शकतो. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरू शकतं.