
Iran Ayatollah Khamenei Protest : जगात अशी काही आंदोलनं उभी राहिलेली आहेत, ज्यामुळे अनेक बड्या नेत्यांना सत्तेच्या सिंहासनावरून पायउतार व्हावे लागलेले आहे. अनेक आंदोलनांनंतर काही ठिकाणी तर क्रांतीच घडून आलेली आहे. इराण देशात महिलांविषयी अतिशय कठोर कायदे आहेत. महिलांनी हिजाब परिधान करून बाहेर जावे, असा तेथील नियम आहे. परंतु गेल्या बऱ्याच वर्षांपासून तिथे या नियमाला विरोध केला जातोय. महिला वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करत आहेत. सोशल मीडियावरही काही महिला या नियमाविरोधात राग व्यक्त करतात. दरम्यान, सध्या या देशाचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनी यांच्याविरोधात नव्या आंदोलनाने जन्म घेतला आहे. इराणमधील तरुणींनी तिथे एक मोठे आंदोलन चालू केले आहे. खामेनी यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी केली जात आहे. महिला, तरुणी खामेनी यांचा फोटो जाळून सिगारेट शिलगावत आहेत. या अनोख्या आंदोलनाची जगभरात चर्चा होत असून खामेनी यांची झोप उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या इराणमध्ये वेगवेगळ्या स्थानिक मुद्द्यांना घेऊन मोठे आंदोलन केले जात आहे. तिथे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याच असंतोषाला आता वेगवेगळ्या पद्धतीने वाट करून दिली जात आहे. लोक इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. इराणी तरुणींनी तर विरोधाची नवी पद्धत चालू केली आहे. इथे तरुणी खामेनी यांच्या फोटोला आग लावत आहेत. सोबतच आग लावलेल्या फोटोपासून त्या सिगारेट पेवटत आहेत. शिगारेट शिलगावलेले फोटो तरुणी सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. साधारण तीन वर्षांपूर्वी महसा अमिनी या मुलीचा हिजाबविरोधी आंदोलनात मृत्यू झाला होता. सध्या तरुणींकडून सोशल मीडियावर चालवल्या जात असलेल्या मोहिमेला महसा अमिनीच्या आंदोलनाशी जोडले जात आहे.
Iranian women fighting for their freedom 💪🏻
Women in Iran face systemic oppression under laws and policies rooted in the Islamic Republic’s interpretation of Sharia, creating institutionalized gender discrimination often described as gender apartheid by human rights… pic.twitter.com/W2mb8pjwuS
— Gaby Rodriguez-Trippconey 🇺🇸🇸🇻 (@GabyRodriguezSV) January 9, 2026
इराणध्ये तरुणींकडून चालू असलेल्या या आंदोलनाची जगभरात चर्चा होत आहे. हे आंदोलन म्हणजे फक्त खामने यांच्या राजसत्तेलाच नव्हे तर महिलावर लागदलेल्या कठोर सामाजिक आणि धार्मिक नियमांनाही आव्हान असल्याचे बोलले जात आहे. सध्या इराण गंभीर आर्थिक संकटात आहे. सोबतच तिथे लोकांमध्ये आक्रोश आहे. असे असताना आता तरुणींच्या या वेगळ्या आंदोलनामुळे इराणमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? याकडे समस्त जगाचे लक्ष लागले आहे.