AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Revolution 2026 : अली खामेनीची क्रूरता जगासमोर आली,एकट्या तेहरानमध्ये 217 जणांना मारलं, संपूर्ण रात्रभर इराणच्या रस्त्यावर हिंसाचाराचा आगडोंब, अराजक

Iran Protest : इराणमध्ये परिस्थिती हातबाहेर गेली आहे. अली खामेनीच्या राजवटी विरोधात इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. प्रचंड जाळपोळ, लूटपाट सुरु आहे. आता हे आंदोलन फक्त तेहरानपर्यंत मर्यादीत नाहीय.

Iran Revolution 2026 : अली खामेनीची क्रूरता जगासमोर आली,एकट्या तेहरानमध्ये 217 जणांना मारलं, संपूर्ण रात्रभर इराणच्या रस्त्यावर हिंसाचाराचा आगडोंब, अराजक
ali khamenei
| Updated on: Jan 10, 2026 | 10:32 AM
Share

इराणमधली परिस्थिती चिघळत चालली आहे. देशभरात आंदोलकांनी धार्मिक नेतृत्वाविरोधात आंदोलन अजून तीव्र केलं आहे. त्यामुळे परिस्थिती खूपच बिघडली आहे. शुक्रवारी रात्री आंदोलकांनी जोरदार प्रदर्शन केलं. ही वाढती अशांतता लक्षात घेऊन सरकारने संपूर्ण इराणमध्ये इंटरनेट सेवा बंदी केली आहे. सुरुवातीला हे आंदोलन महागाई, बेरोजगारी आणि चलन घसरणी विरोधात होतं. पण हळू-हळू हे आंदोलन सत्ता आणि धार्मिक नेतृत्वाविरोधात प्रदर्शनामध्ये बदललं. आता हे आंदोलन फक्त तेहरानपर्यंत मर्यादीत नाहीय. तेहरानच्या एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर टाइनम मॅगजीनला सांगितलं की, राजधानी तेहराच्या सहा रुग्णालयात कमीत तमी 217 आंदोलकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात बहुतांश मृत्यू हे गोळी लागल्यामुळे झाले आहेत.

इराणची राजधानी तेहरानशिवाय अलावा मशहद, कोम, इस्फ़हान, मशिरियेह,कजविन, बुशहर, वज्द या शहरातही हिंसक विरोध प्रदर्शनं सुरु आहेत. आंदोलकांनी अनेक ठिकाणी रस्त्यावर जाळपोळही केली. त्यामुळेच आंदोलनाला नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण इराणमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

एकट्या तेहरानमध्ये 217 मृत्यू

आंदोलन सुरु होऊन 14 दिवस झालेत. यात आतापर्यंत 5 लाखापेक्षा जास्त लोक सहभागी झाले आहेत. इराणमध्ये वेगवेगळ्या भागात जवळपास 400 ठिकाणी आंदोलन सुरु आहे. प्रदर्शनादरम्यान हिंसक झडपा झाल्या. त्यात एकट्या तेहरानमध्ये 217 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. सोबत सैन्याचे 14 जवान मारले गेले. पोलिसांनी आतापर्यंत 2300 लोकांना ताब्यात घेतलं आहे.

IRGC कॅम्पवर हल्ला

इराणच्या 20 प्रांतांमध्ये ही बंडाची आग पसरली आहे. 110 पेक्षा जास्त शहरात मोठ्या प्रमाणात प्रदर्शन सुरु आहे. रुग्णालयात तोडफोडीचे अनेक प्रकार समोर आलेत. आंदोलकांनी IRGC कॅम्पवर हल्ला केलेला. त्याशिवाय तेहरानमध्ये 26 बँक लुटीच्या घटना घडल्या आहेत. 25 मशि‍दीमध्ये आगी लावण्याचे प्रकार घडले. 10 सरकारी इमारती जळून खाक झाल्या आहेत. 24 अपार्टमेन्टचं नुकसान झालं आहे. 48 फायर ब्रिगेडच्या गाड्या जाळल्या. 42 बसेसना आगी लावल्या. कॉलेज, यूनवर्सिटी बंद आहेत. संपूर्ण देशात इंटरनेट सेवा बंद झाली आहे.

25 मशि‍दींमध्ये आगी लावण्यात आल्या

“इराणची राजधानी तेहरानमध्ये या हिंसाचारामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. एका रुग्णालयाचं नुकसान झालं आहे. दोन मेडिकल सेंटर, 26 बँका लुटल्या आहेत. 25 मशि‍दींमध्ये आगी लावण्यात आल्या. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स मिलिशिया बसीजच्या हेडक्वार्टरवर हल्ला झाला आहे. इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम राजधानीत झालेल्या नुकसानीला दुरुस्त करत आहेत” असं तेहरानचे महापौर अलीरेज़ा ज़कानी यांनी सांगितलं. दंगलखोरांनी सरकारी इमारती, 48 फायट ट्रक्स, 42 बस आणि रुग्णवाहिका, सोबतच 24 अपार्टमेन्टच नुकसान केलं आहे.

बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा
बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा.
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत.
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप.
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड.
भाजपचं बेगडी हिंदुत्व, दानवेंकडून रावसाहेब दानवेंचा जुना व्हिडीओ ट्वीट
भाजपचं बेगडी हिंदुत्व, दानवेंकडून रावसाहेब दानवेंचा जुना व्हिडीओ ट्वीट.
भाजप आमदाराची भरसभेत थेट फडणवीसांकडे अजितदादांची तक्रार, म्हणाले...
भाजप आमदाराची भरसभेत थेट फडणवीसांकडे अजितदादांची तक्रार, म्हणाले....
जिसे लढना ना मालूम वह तीर तलवार क्या जाने, गुलाबराव पाटलानी सभा गाजवली
जिसे लढना ना मालूम वह तीर तलवार क्या जाने, गुलाबराव पाटलानी सभा गाजवली.
उद्धव ठाकरेंनी घोटाळे करुन मुंबईला लुटलं... एकनाथ शिंदेंनी वाचला पाढाच
उद्धव ठाकरेंनी घोटाळे करुन मुंबईला लुटलं... एकनाथ शिंदेंनी वाचला पाढाच.
ठाकरे म्हणाले अश्रू नव्हे हे अंगार! उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात का पाणी?
ठाकरे म्हणाले अश्रू नव्हे हे अंगार! उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात का पाणी?.
खोट्या गुन्ह्यात फडणवीस-शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न; अहवालातून मोठी...
खोट्या गुन्ह्यात फडणवीस-शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न; अहवालातून मोठी....