इराणची ही मागणी पूर्ण करण्यास अमेरिका तयार ? भारताचाही होणार मोठा फायदा….

इराण आणि अमेरिकेत शांतता चर्चेत फारसी प्रगती झालेली नसली तरी यात आता इराणने एक सुधारित प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला पाठवला आहे. त्यात इराणने केलेली मागणी अमेरिकेने मान्य केल्याचा दावा इराणच्या प्रसारमाध्यमांनी केला आहे.

इराणची ही मागणी पूर्ण करण्यास अमेरिका तयार ? भारताचाही होणार मोठा फायदा....
trump and mojtaba
| Updated on: May 18, 2026 | 8:54 PM

अमेरिका आणि इराण यांच्या सुरु असलेल्या संघर्षात एक दिलासादायक वृत्त आले आहे. इराणची सरकारी न्यूज एजन्सी तस्नीम हीने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिका इराणची एक मोठी मागणी पूर्ण करण्यास राजी झाला आहे. इराणला त्याच्यावर तेल विक्रीवर लावलेले निर्बंध संपूर्णपणे हटवावेत, म्हणजे मार्केटमध्ये त्याचे स्थान पुन्हा तयार होईल असे वाटत आहे. अमेरिका आणि इराण दरम्यान चर्चेचा जो नवा मसुदा तयार होत आहे. त्यात त्याने अमेरिकेकडे तेल विक्रीवरील इराणचे निर्बंध हटवावेत अशी मागणी केली आहे.विशेष म्हणजे अमेरिका यासाठी राजी झाला आहे. त्यामुळे ही भारतासाठी चांगली बातमी आहे. कारण इराणला जर तेल विक्रीची सूट दिली तर भारताला रशियासोबतच आणखी एक खात्रीशीर मार्ग उपलब्ध होईल.

निर्बंध हटवण्याच्या मागणीवर इराण कायम

या चर्चेतील सहभागी एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार इराण अजूनही त्यांच्यावरील निर्बंध पूर्णपणे हटवावेत या मागणीवर कायम आहे. निर्बंधांपासून दिलाशाला भविष्यातील कोणत्याही करारात अमेरिकेचे मुख्य प्रतिबद्धतेच्या रुपात गॅरंटीड सहभागी करायला हवे. दुसरी कडे अमेरिका सध्या केवळ एक तात्पुरत्या मूभेचा फॉर्म्युला देत आहे. तो तोपर्यंत लागू राहिल जोपर्यंत कोणताही अंतिम आणि व्यापक तोडगा निघत नाही. अमेरिकेने अंतिम सहमती बनेपर्यंत ओएफएसी निर्बंधात सूट देण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे तस्नीम वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

पाकिस्तानद्वारे अमेरिकेला पाठवला नवा शांतता प्रस्ताव

याआधी ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेच्या एका बातमीनुसार इराणने मध्य पूर्वेच्या या मोठ्या संघर्षाला समाप्त करण्यासाठी एक सुधारित प्रस्ताव पाठवला आहे. ज्यास पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेपर्यंत पाठवण्यात आला आहे. अलिकडेच इस्लामाबादने इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान शांतता करारासाठी यजमान पद भूषवले होते, मात्र, त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. या दरम्यान, सोमवारी इराणने वक्तव्य जारी करत म्हटले की युद्धाला समाप्त करण्यासाठी अमेरिकेच्या एका नव्या प्रस्तावावर आम्ही आमची प्रतिक्रीया दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा

या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराणला अत्यंत कठोर शब्दात इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की जर कोणताही शांतता करार झाला नाही तर इराणचे कोणतेही नामोनिशान उरणार नाही. त्यांनी त्यांच्या ट्रुथ सोशलवर पोस्ट करत लिहीले की इराणसाठी घड्याळाची टिक-टिक सुरु आहे. आणि चांगेल हे असेल की त्यांनी वेगाने पावले उचलावीत, अन्यथा त्यांचे काहीही वाचणार नाही. वेळ खूपच मौल्यवान आहे !

Follow Us