Iran-Israel : युद्धात नेहमीच जिंकणाऱ्या इस्रायलसमोर हरण्याचं मोठ संकट, आर्मी चीफच्या वक्तव्याने नेतन्याहू यांचे धाबे दणाणले

Iran-Israel : इस्रायल हा एक छोटा देश आहे. स्थापनेपासूनच इस्रायलने आतापर्यंत अनेक युद्ध लढली आहेत. ही सर्व युद्ध त्यांच्या अस्तित्वाची लढाई होती. युद्धात जिंकण्याची सवय लागलेल्या इस्रायलसमोर आता नवीन संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे नेतन्याहू यांची चिंता वाढली आहे.

Iran-Israel : युद्धात नेहमीच जिंकणाऱ्या इस्रायलसमोर हरण्याचं मोठ संकट, आर्मी चीफच्या वक्तव्याने नेतन्याहू यांचे धाबे दणाणले
Cabinet Meeting benjamin netanyahu
Image Credit source: Israel Pmo
| Updated on: Mar 27, 2026 | 2:19 PM

इराण विरुद्ध युद्ध सुरु असताना इस्रायली डिफेन्स फोर्सच्या प्रमुखांनी भर कॅबिनेट मीटिंगमध्ये एक स्टेटमेंट केलं. त्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. “इराण युद्ध सुरु असताना जी परिस्थिती आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसात आपलं सैन्य कोसळू शकतं” असं इस्रायली डिफेन्स फोर्सचे प्रमुख इयाल जमीर मीटिंगमध्ये बोलले. कॅबिनेटच्या या बैठकीला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री केंट सुद्धा उपस्थित होते. द टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, जमीर यांनी आपल्या संबोधनात म्हटलं की, “आपण लवकरच संपणार आहोत. कारण एका बाजूला ऑपरेशन्सची मागणी वाढतेय. दुसरीकडे आम्ही सैन्य संख्येच्या कमतरतेचा सामना करतोय. लवकरच यात सुधारणा करावी लागेल”

जमीर कॅबिनेट बैठकीत बोलले की, “मी आता तुमच्यासमोर जे 10 धोके आहेत, त्या बद्दल सांगतोय. वेळीच यात सुधारणा केली नाही तर सैन्य कोसळून जाईल. आता ही जबाबदारी घेण्याची वेळ आहे” जमीर यांच्यानुसार राखीव सैनिकांच्या बळावर तुम्ही जास्त काळ युद्ध लढू शकत नाही. इस्रायली डिफेन्स फोर्सला अनिवार्य सैन्य सेवा कायदा आणि आरक्षित सेवा कायदा आणि अनिवार्य सेवा कालावधी वाढवण्याच्या कायद्याची आवश्यकता आहे” असं जमीर म्हणाले.

इस्रायलमध्ये सैन्यात सहभागी व्हायला कोणी विरोध केला?

जे लोक यात सहभागी होत नाहीयत, त्यांच्यासाठी सभागृहात कायदा मंजूर केला पाहिजे असं इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा स्पष्ट संदेश आहे. इस्रायलमधील हरेदी समुदायाने सैन्यात सहभागी व्हायला विरोध केला आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांनी या प्रश्नांबद्दल कॅबिनेट बैठकीत गंभीर चिंता व्यक्त केली. पंतप्रधान कार्यालयाकडून लवकरच या समस्येचं निराकरण करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

इस्रायल एकाचवेळी किती देशांविरुद्ध युद्ध लढतोय?

वर्तमानात 15,000 सैनिकांच्या कमतरतेचा सामना करावा लागतोय असं इस्रायली सैन्याचे प्रवक्ते एफी डेफ्रिन म्हणाले. यात 8000 लढणारे सैनिक आहेत. इस्रायली सैन्य ऑक्टोंबर 2023 पासून युद्ध लढत आहे. इस्रायली सैन्य एकाचवेळी गाजा, सीरिया, लेबनॉन, इराण आणि इराक या देशांविरोधात युद्ध लढत आहे.

इस्रायली सैन्याकडे वर्तमानात 1 लाख 70 हजार सक्रिय सैनिक आहेत. 4 लाख रिझर्व्ह सैनिक आहेत. इस्रायलने युद्धात सर्व रिझर्व्ह सैनिकांना मैदानात उतरवलं आहे.

Follow Us